डफळापूर, संकेत टाइम्स : डफळापूर जिल्हा परिषद गटातील मौजे जिरग्याळ येथे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आणि स्थायी आणि समाजकल्याण समिती सदस्य महादेव दुधाळ-पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे सन 2020-2021 साठी त्रेचाळीस लाख रुपयाची विविध विकास कांमाना निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती जिल्हा परिषद सदस्य महादेव पाटील यांनी दिली.
जिरग्याळ कोरे वस्ती अंगणवाडी क्रमांक 22 नवीन इमारत बांधणे 8 लाख 50 हजार,प्राथमिक आरोग्य उपकेंद्र दुरूस्त करणे 6 लाख,2 नवीन शाळा खोल्या बांधणे 17 लाख 50 हजार,नवबौद्ध वस्तीचा विकास करण्याअंतर्गत बंदिस्त गटारी बांधणे 8 लाख,
जिरग्याळ मधील मिनी अंगणवाडी(गाव भाग) क्रमांक 87 दुरूस्ती करणे 1 लाख,जिरग्याळ गाव भाग अंगणवाडी क्रमांक 88 दुरूस्ती करणे 1 लाख,जिरग्याळ – शेळकेवाडी अंगणवाडी क्रमांक 89 दुरूस्ती करणे 1 लाख,ही सर्व विकासकामे जि.प.सदस्य श्री महादेव पाटील यांच्या प्रयत्नातून निधी मंजूर करण्यात आला.लवकरचं कामांना सुरूवात करण्यात येणार आहे.







