बनाळी,संकेत टाइम्स : मौजे वायफळ (ता.जत)येथील जि.प.शाळेचा माॅडेल स्कूलमध्ये समाविष्ठ केल्या बद्दल
माजी आमदार विलासराव जगताप व महिला,बालकल्याण सभापती सौ.सुनिता सुनील पवार यांचा वायफळ ग्रामस्थ व शालेय शिक्षण समितीच्या वतीने नागरी सत्कार केला.
वायफळ येथील जिल्हा परिषद शाळेस सौ.पवार यांच्या प्रयत्नातून दीड कोटी रूपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.या निधीतून शाळेचा विकास करण्यात येणार आहे.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी आमदार विलासराव जगताप,भाजपाचे तालुकाध्यक्ष सुनील पवार,पं.स.सदस्य रवींद सावंत,प्रमोद सावंत,गावातील सरपंच,उपसरपंच, सर्व शिक्षक उपस्थितीत होते.
श्री.जगताप,सुनिता पवार,सुनील पवार ,रवींद्र सावंत,प्रमोद सावंत यांनी मनोगते व्यक्त केले.बाळासाहेब जगताप,वसंत याद,राजू यादव,श्री.टोणे सर उपस्थित होते.
वायफळ ता.जत येथे माजी आमदार विलासराव जगताप,सौ.सुनिता पवार यांचा सत्कार करण्यात आला.





