जत-डफळापूर रस्त्याचे काम पुन्हा निकृष्ठ | डांबरीकरण पुन्हा उखडले

0
25



जत,संकेत टाइम्स : जत ते डफळापूर या मार्गाचे काम करण्यात येत आहे.मात्र ठेकेदाराकडून पुन्हा दर्जाहीन काम होत आहे.संबधित अधिकारी कामाच्या ठिकाणी उपस्थित राहत नसल्याने लवकरचं पुन्हा रस्त्याला खड्ड्याचे ग्रहण लागणार आहे.

गेल्या चार वर्षात या रस्त्यावर जतच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आले आहेत. 






अगदी रस्ता राष्ट्रीय महामार्गाकडे वर्ग होण्याअगोदरही सुमारे 80 लाखाचा निधी या रस्ते कामावर उधळल्याची चर्चा आहे. त्यात ठेकेदारासह जतच्या अधिकाऱ्यांनीही चांगलीच‌ कमाई केल्याचे आरोप झाले आहेत.

वर्षाभरापुर्वी हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे गेला आहे. कोल्हापूर येथील कार्यालयातून रस्त्याचे काम करण्यात येत आहे.






तेही नियम ढाब्यावर बसवून सुरू आहे.गेल्या दोन महिन्यापुर्वी असेच खड्डे भरण्यात आले होते.ते आठवड्यात उखडले होते.पुन्हा रस्त्याचे काम सुरू आहे.आतातरी कहर होत असून शासन आदेशानुसार रस्त्यावरील टाकण्यात येत असलेले डांबरीकरण पुढे सुरू असताना मागे उखडत असल्याने खड्ड्याचे ग्रहण सुटणार नसल्याचे स्पष्ट होत आहे.





प्रचंड गतीने काम


ठेकेदाराकडून प्रचंड गतीने काम सुरू आहे.मात्र डांबर टाकताना अगदी अर्धा ते दोन फुटापर्यत डांबर टाकण्यात येत आहे. काही ठिकाणचे केलेले डांबरीकण अगदी काही तासात उखडून खड्डी वर्ती येत आहे.त्यामुळे राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांकडूनही अशा कामांना पाठीशी घालण्याचा आणखीन एक नवा अनुभव जतच्या जनतेला येत‌ आहे.






जत ते डफळापूर या रस्त्याचे डांबरीकरण असे उखडत आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here