जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात बुधवारी कोरोना बाधित संख्या कमी झाली.मंगळवारी अचानक 23 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने चिंता वाढली होती.मात्र बुधवारी फक्त दोघेजण कोरोना बाधित आढळून आले आहेत.त्यामुध्ये जत 1,बिळूर 1 येथे नवे रुग्ण आहेत.
दरम्यान जिल्ह्यातीलही संख्या कमी झाली असून जिल्ह्यात 64 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.त्यामध्ये सांगली महापालिका 34,आटपाडी 4,कडेगाव 3,खानापूर 3,पलूस 2,तासगाव 1,जत 1,कवटेमहांकाळ 3,मिरज 6,शिराळा 1वाळवा 7,असे बुधवारी नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.







