जतच्या विकासासाठी मतभेद नकोत‌ ; उत्तम चव्हाण, अशोक कोळी

0
6



जत,संकेत टाइम्स : राष्ट्रवादी कॉग्रेस,

कॉग्रेस‌,शिवसेना महाआघाडीचे शासनाकडून सध्या‌ जत तालुक्यात विकासात्मक कामे होत आहेत. जतचे‌ आमदार कॉग्रेसचे‌ आहेत,त्यांच्याकडूनही जतच्या विकासासाठी पाठपुरावा सुरू आहे.त्याचबरोबर पालकमंत्री जयंत पाटील यांच्या माध्यमातून मुळ‌ जतचे असलेले त्याचे पिए हे‌ जतला विकास योजना देण्यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न होत आहेत.









कॉग्रेस‌ असो वा राष्ट्रवादी कॉग्रेस आपण एकमेकाविरोधात‌ बोलण्यापेक्षा दोन्ही पक्षाच्या माध्यमातून जतच्या विकास कामांना प्राधान्य देऊयात,असे आवाहन राष्ट्रवादी कॉग्रेसचे‌ ‌नेते उत्तम चव्हाण ‌व अशोक कोळी यांनी केले आहे.

चव्हाण,कोळी म्हणाले, महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे सरकार आहे. राष्ट्रवादी कॉग्रेस, कॉग्रेस व शिवसेना व इतर मित्रपक्ष एकमेकांच्या हातात हात घेवून महाराष्ट्र राज्यामध्ये अत्यंत चांगले काम करत आहे,असे असताना राज्याचे जलसंपदामंत्री व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांचे पि.ए. जर जत तालुक्यात येवून गोरगरीब, सामान्य जनतेच्या अडी अडचणी समजावून घेवून त्या सोडविण्याचा प्रयत्न करीत असतील तर जत तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने चांगलेच आहे.






महाविकास आघाडीचा घटक पक्ष या नात्याने विद्यमान आमदार यांना याचा नक्कीच फायदा होईल. महाविकास आघाडी घटक पक्षातील आपापसातील हेवेदावे बाजूला ठेवून जत तालुक्याचा सर्वांगीन विकासासाठी एकमेकांना विद्यमान आमदारांनी साथ देण्याची ‌गरज आहे.यावेळी नगरसेवक स्वप्नील शिंदे, हेमंत खाडे, पवन कोळी, हेमंत चौगुले, संतोष देवकर, राजेसाहेब डफळे, रुपेश पिसाळ, जयंत भोसले आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थीत होते.



Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here