सांगली जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक | सोमवारी तब्बल 84 नवे रूग्ण ; चिंता वाढली

0
8



सांगली : सांगली जिल्ह्यात नियंत्रणात असलेली कोरोनाची संख्या सोमवारी चारपट वाढली असून एकाच दिवशी तब्बल 84 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने चिंता वाढली आहे.

राज्यभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने धुमाकूळ घातला आहे.राज्यातील अनेक जिल्हे लॉकडाऊन करण्यात आले आहे. सांगली जिल्ह्यात गेल्या काही दिवसात  रुग्ण संख्या मर्यादित होती.





मात्र सोमवारी कोरोनाच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.जिल्ह्यातील सांगली महापालिकेसह दहा तालुक्यात गेल्या महिन्यातील सर्वाधिक 84 रुग्ण सोमवारी आढळून आले आहेत.सोमवारी करण्यात आलेल्या 307 आरटीपीसीआर टेस्ट तपासणीपैंकी 57 तर अँन्टिजन टेस्टमधून 362 जणांच्या तपासणीत 29 असे 84 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.






त्यात सांगली,मिरज,कुपवाड महापालिका क्षेत्रात 22,(सांगली 14,मिरज 8),आटपाडी 4,कडेगाव 11,खानापूर 18,तासगाव 7,जत 3,कवटेमहांकाळ 1,मिरज 5,शिराळा 8,वाळवा 5 असे या तालुक्यात कोरोना रुग्ण आढळले आहेत.सोमवारी एकाही रुग्णाचा मुत्यू झालेला नाही.तर 30 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.आतापर्यत 49हजार 4 रुग्ण कोरोना बाधित झाले आहेत.46 हजार 860 जण कोरोनामुक्त झाले आहेत.तर 1769 रूग्णाचा मुत्यू झाला आहे.375 रुग्णावर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहे.






जिल्ह्यातील वाढलेली कोरोना रुग्णाची संख्या चिंता वाढवणारी आहे.यामुळे प्रशासनाकडून कठोर निर्णय होण्याची शक्यता नाकारता येत नाही.नागरिकांनी काळजी घ्यावी,असे सातत्याने आवाहन करूनही गांर्भिर्य घेतले जात नाही,परिणामी जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट प्रभाव दाखविणार हे स्पष्ट झाले आहे.



जत तालुक्यात सोमवारी 4 नवे रुग्ण



जत,संकेत टाइम्स : जत‌ तालुक्यात सोमवारी 4 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यात जत शहर 3,कासलिंगवाडी 1 येथे नवे रुग्ण आढळून आले आहेत.






यामुळे तालुक्यातील बाधित संख्या 2102 झाली आहे. आतापर्यत 2007 जण कोरोना मुक्त झाले आहेत. तालुक्यातील सध्या 20 रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत‌ आहेत.तर 8 जण होम आयसोलेशन मध्ये आहेत.






तालुक्यातील कोरोना बाधित संख्या हळूहळू वाढत असल्याने चिंता वाढली आहे. नागरिकांनी मास्क, सोशल डिस्टसिंग  पाळावे,सर्व प्रकारे खबरदारी घ्यावी,असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here