जत,संकेत टाइम्स : लॉकडाऊनच्या काळातील घरगुती वीज बिले माफ करावीत, या मागणीसाठी
आम्ही यापुर्वीच महावितरणला निवेदन दिले आहे,कोरोनामुळे शेतकरी,नोकरदार,मजूर सर्वजणच अडचणीत आहेत.सरकारने लोकांची चेष्ठा चालवली आहे.
अधिवेशनाच्या सुरुवातीला वीज कनेक्शन तोडणीस स्थगिती द्यायची आणि शेवटच्या दिवशी उठवायची, हा विधिमंडळाचा अवमान आहे.जत तालुक्यातील ग्राहकांचे विज कनेक्शन तोडाल तर गाठ माझ्याशी आहे,असा इशारा माजी आमदार विलासराव जगताप यांनी दिला आहे.
लॉकडाऊनच्या काळातील सहा महिन्यांची घरगुती वीज बिले माफ करावीत,अशी मागणी भाजपने केली आहे. केरळ, मध्य प्रदेश व गुजरात या राज्यांनी घरगुती वीज बिलांमध्ये सहा महिन्यांसाठी 50 टक्के सवलत दिली आहे.
कर्नाटक सरकारने रिक्षाचालक, टॅक्सीचालक, फळभाजी विक्रेते, बांधकाम व यंत्रमाग कामगार घटकांना रोख मदत दिली आहे. मात्र महाराष्ट्र सरकारने काहीच केलेले नाही, ही बाब खेदजनक आहे.
सध्या महावितरण कडून अन्यायकारक विज कनेक्शन तोडण्यात येत असल्याचा माहीती आमच्यापर्यत आली आहे. परिस्थिती गंभीर आहे,त्यामुळे विज कनेक्शन तोडण्याच्या भानगडीत कर्मचाऱ्यांनी पडू नये,असेही जगताप यांनी सांगितले.









