बेवनूरमध्ये स्पार्किंग होऊन शेतीचे‌ लाखोचे नुकसान | शेतकऱ्यांची महावितरण विरोधात‌ पोलीसात तक्रार | Sparks cause damage to agriculture in Bevanur Farmers lodge complaint with police against MSEDCL

0
4



जत,संकेत टाइम्स : महावितरनचा निष्काळजी पुन्हा एकदा‌ समोर आला आहे.गेल्या तीन महिन्यापासून सातत्याने तक्रार करूनही विद्युत वाहिनीची दुरूस्ती केली नसल्याने बेवनूर ता.जत येथे स्पार्किंग होऊन पडलेल्या ठिनग्यामुळे सुमारे 70 शेतकऱ्यांच्या मोटारी,पिके,वृक्षाचे लाखो रूपयाचे नुकसान झाले आहे.

याप्रकरणी शेतकऱ्यांनी महावितरण विरोधात जत पोलीसात तक्रार दिली आहे.







बेवनूर येथील दादासाहेब रामहरी वाघमोडे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे,बेवनूर हद्दीतील वाघमोडे यांच्या मालकीच्या गट नंबर 727 मध्ये मोटारीचे कनेक्शन आहे.तेथे‌ गेल्या तीन महिन्यापासून जोडणीमध्ये काही तांत्रिक अडचणी आल्याने सातत्याने स्पार्किंग होत होते.याबाबत महावितरणच्या कार्यालयाकडे अनेक वेळा कळविण्यात आले होते.मात्र त्यांनी जाणिवपुर्वक दुर्लक्ष केले.





परिणामी शनिवार ता.13 रोजी मोठ्या प्रमाणात स्पार्किंग झाले.त्यातून ठिनग्या पडल्याने आग लागली,त्यात वाघमोडे यांच्या शेतासह परिसरातील 70 शेतकऱ्यांच्या जमिनीतील बोअरवेल्सच्या पाईप्स,केबल,पिके,

झाडे,व गवत जळून खाक झाले आहे.





महावितरणच्या बेजबाबदार पणाचा फटका या परिसरातील शेतकऱ्यांना बसला आहे.झालेल्या लाखो रूपयाची नुकसान भरपाई महावितरणने द्यावी,व संबधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी,अशी मागणी वाघमोडे यांनी तक्रारीत केली आहे.







बेवनूर ता.जत येथे स्पार्किंग होऊन शेतीचे‌ झालेले नुकसान 

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here