दुध्द उत्पादक शेतकऱ्यांचे यापुढे जीवनमान उंचावेल ; धैर्यशील सांवत | It will further raise the living standards of dairy farmers Be patient

0
8



जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यातील दुग्ध उत्पादक शेतकऱ्याचे यापुढे जीवनमान उंचावेल,असे प्रतिपादन आमदार विक्रमसिंह सांवत यांचे चिरजिंव धैर्यशील सांवत यांनी केले.तिप्पेहळ्ळी ता.जत येथील श्री. सिध्दी विनायक दुध संकलन केंद्राचा वर्धापन दिन सांवत यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.






त्यावेळी ते बोलत‌ होते.

सावंत पुढे म्हणाले, जत तालुक्यात दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे.आतापर्यत खाजगी दुध संघाकडून शेतकऱ्यांची गळचेपी होत होती.म्हणून आ.विक्रमसिंह सांवत यांच्या प्रयत्नातून शासकीय दुध संघ सुरू करण्यात आला आहे. या माध्यमातून दुधा योग्य भाव देण्यात येत आहे. तालुकाभर या संघाची व्याप्ती वाढविण्यात येत आहे.







यावेळी संरपच रविंद्र शिंदे,प्रकाश शिंदे,मारुती शिंदे,अमर शिंदे,राहुल शिंदे,प्रकाश चव्हाण, पवन शिंदे,अनिल चव्हाण, सतिश चव्हाण, प्रकाश सूर्यवंशी,संजय शिंदे,भीमराव कटरे,उमेश शिंदे,जयदिप शिंदे,संजय चव्हाण,रविंद्र शिंदे आदी उपस्थित होते.







तिप्पेहळ्ळी येथील श्री.सिध्दीविनायक दुध संकलन केंद्राचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here