आशांना आजारासाठी मदतीची गरज | आशा वर्कर्स युनियनची मागणी | Hope needs help with illness | Demand of Asha Workers Union

0
7



जत,संकेत टाइम्स : आशा स्वंयसेविकांना उपचारासाठी जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून तरतूद करण्यात यावी,अशी मागणी आशा वर्कर्स युनियन कडून करण्यात आली. तसे निवेदन राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद गटनेते शरद लाड यांना कॉम्रेड हणंमत कोळी यांनी निवेदन दिले.






निवेदनात म्हटले आहे की,

सांगली जिल्ह्यात सुमारे 2000 स्वयंसेविका व 98 गटप्रवर्तक अशा एकूण 2098 महिला आरोग्य विभागात काम करत आहेत.आशा स्वयंसेविका ह्या आरोग्य विभागाच्या सध्याच्या परिस्थिती आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा घटक आहेत.







मात्र त्यांच्या अपघात,विविध आजाराबाबत कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही.दोन विमा योजना आहेत,पंरतू त्यांचा लाभ मुत्यूनंतर होतो.जिवंतपणी आजारी पडलेल्या या स्वयंसेवक महिलांना मदतीची गरज आहे.नुकत्याच विटा प्राथमिक आरोग्य केंद्रातील आशा स्वयंसेविका शकिला मुजावर ह्या ट्रेनिंगसाठी जात असताना झालेल्या अपघातात त्या गंभीर जखमी 

झाल्या आहेत.त्यांच्यावर सांगलीतील भारती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.त्यांच्या उपचाराचे बिल भरण्याचीही त्या आशाची परिस्थिती नाही.इतर आशांनी वर्गणी काढून त्यांना मदत केली आहे.या घटनेवरून आशांना जिंवतपणी उपचारासाठी आर्थिक तरतूद करण्याची गरज आहे.जिल्हा परिषदेकडून तशी तरतूद करावी,अशी मागणी निवेदनात केली आहे. 

 




आशांना आजारासाठी मदतीची तरतूद करावी अशी आशा वर्कर्स युनियनच्या  वतीने मागणी करण्यात आली.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here