जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात गेल्या दिड वर्षात महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून 112 कोटी 10 लाखाचा निधी आणला असून तालुक्यातील जनतेनी माझ्यावर दाखविलेला विश्वास सार्थ ठरवणार असल्याचे आमदार विक्रमसिंह सांवत यांनी पत्रकार बैठकीत सांगितले.
यावेळी माजी सभापती बाबासाहेब कोडग, कॉग्रेसचे कार्याध्यक्ष नाना शिंदे उपस्थित होते.
आ.सांवत म्हणाले,तालुक्यात आमदार फंड साडेतीन कोटी तर 1 कोटी प्रस्तावित आहेत.सामाजिक न्यायकडून 1 कोटी 98 लाख,25/15 मधून 5 कोटी 75 लाख,एसआर 30/54 मधून 6 कोटी 92 लाख,एफ डी आर पूरहानी 6 कोटी 92 लाख,जिल्हा नियोजन मधून शाळा खोल्यासाठी 5 कोटी 26 लाख,नवीन अंगणवाडी इमारतीसाठी 3 कोटी 57 लाख,अंगणवाडी इमारती दुरूस्ती 54 लाख,रस्त्यासाठी 6 कोटी 60 लाख,आरोग्य विभागसाठी 85 लाख,पशु वैद्यकीय दवाखाना संरक्षक भिंत 7 लाख,सीमेंट नाला बंधारे 60 लाख,
जत नगरपरिषदेसाठी नगरोत्थान योजनेतून 2. कोटी,बजेट मधून 20 कोटी 40 लाख,नाबार्ड 3 कोटी 50 लाख,नवीन चेकडम : 12 चेकडम व पाझर तलावसाठी जलसंधारण महामंडळाकडून 16 कोटी 20 लाख,सीएसआर फंड 35 लाख,म्हैसाळ कालवा दुरूस्ती व व्यवस्थापन 1 कोटी,तालुक्यातील 25 शाळाकरिता खनिजकर्म बाधित विभागाकरिता 50 लाख प्रस्तावित आहेत.धनगर समाज क प्रवर्गसाठी कृषी पंप,घरगुती विज जोडणी करिता सुमारे 7 कोटीची मागणी प्रस्तावित आहे,त्याला लवकरचं मंजूरी मिळणार आहे.
क प्रवर्ग आणि वडर व इतर समाजाकरिता समाज कल्याण विभागाकडून घरकूल मंजूर आहेत,त्याचे प्रस्ताव करण्याचे आदेश प्राप्त झाले आहेत.पुराने नुकसान झालेल्या नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना 5 कोटी 87 लाख मिळवून दिले.मनुष्य जीवित हानी 20 लाख,पशूहानी 2 लाख,पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना अतर्गंत तालुक्यात 24 कोटी 31 लाख रूपयाचा निधी मिळाला आहे.
आ.सांवत म्हणाले,तालुक्यात महत्वाच्या म्हैसाळ सिंचन योजनेचे उर्वरित काम महिन्याभरात पुर्ण होणार आहे.चालू आवर्तनात तालुक्यातील शक्य आहेत तेवढे तलाव भरून घेण्यासाठी मी पाठपुरावा करत आहे.तालुक्यातील नागरिकांचे अनेक वर्षापासून असलेल्या समस्या, प्रश्न सोडविण्यासाठी मी सातत्याने पाठपुरावा करत आहे.विकास कामे आम्ही करत आहोत,त्यांची वस्तुनिष्ठ माहिती संबंधित विभागाकडे उपलब्ध आहे.कुणाला पाहिजे असेलतर मिळू शकेल,आरोप करण्यापेक्षा मला तालुक्यासाठी काम करायचे आहे,असे आ.विक्रमसिंह सांवत यांनी सांगितले.
भूसंपादनाचे साडेनऊ कोटी रूपये दिले
तालुक्यातील तिकोंडी तलाव 2,भिवर्गी,मोटेवाडी संखसह म्हैसाळ योजनेत जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांचे जवळपास 20/30 वर्षापासून किरकोळ त्रुटीमुळे संबधित विभागाकडे असलेले पैसे त्रुटी दूर करून त्यांना मिळवून देण्यासाठी मी पाठपुरावा करत आहे. आतापर्यत साडे नऊ कोटीचा शेतकऱ्यांना मोबदला मिळवून दिला आहे.अन्य ठिकाणच्याही अडचणी दूर करून सर्वांना पैसे देण्यासाठी मी सातत्याने पाठपुरावा करत आहे.










