जत,संकेत टाइम्स : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांचा भव्यदिव्य पुतळा उभारण्यासाठी विधासभेत मांडण्यात आलेल्या अर्थसंकल्पात उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी निधीची तरतुद करण्यात आली आहे. येथे श्री.बसवेश्वरांचा पुतळा उभारण्यात येणार आहे.
हा पुतळा उभारावा म्हणून जतचे भाजपचे युवा नेते लक्ष्मण जखगोंड, अनिल पाटील यांच्यासह जत तालुका लिंगायत समाज्याच्या वतीने मागणी करत जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले होते.
जगतज्योती महात्मा बसवेश्वरांचे कार्य आजही प्रेरणादायी असून पण त्याचे भव्य स्मारक उभारण्यात आले नव्हते.त्यामुळे लिंगायत समाजाची ही मागणी भाजपच्या युवा नेत्यांनी लावून धरली होती.अखेर मुख्यमंत्री अजित पवार यांनी पुतळा उभारण्याची घोषणा केल्याने मागणी पुर्ण झाली आहे.लिंगायत समाजातून उपमुख्यमंत्री पवार यांचे आभार मानण्यात येत आहे.
यावेळी बोलताना युवक नेते
लक्ष्मण जखगोंड बोलताना म्हणाले
की,मंगळवेढा व जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात लिंगायत समाज आहे.त्यांचे आराध्य असलेले जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांचे भव्यदिव्य पुतळा व स्मारक उभा करण्याची मागणी आम्ही केली होती.त्या मागणीची दखल घेत महाविकास आघाडी सरकारने पुतळा उभारण्याची घोषणा केली आहे.हे स्मारक येत्या तरुण पिढीला मार्गदर्शक ठरेल.
यातीलफोटो कट करून घ्या








