जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यातील मौजे कोसारी येथील मुख्य रस्ता काही लोकांनी अडविला असून तो खुला करावा,या मागणीसाठी गावातील जागरुक युवक किसन टेंगले यांच्यासह गावकरी उपोषणास बसले आहेत.
या उपोषणस्थळी बीडीओ धरणगुत्तीकर यांनी भेट देऊन सदर रस्ताची स्थळ पाहणी केली.त्यांनतर रस्ता खुला करण्याबाबत चर्चा केली,तोपर्यंत कुण्या गाव पुढाऱ्यांचा फोन आला आणि बीडिओनी भूमिका बदलली यावरून जत पंचायत समितीचे प्रशासन गाव पुढाऱ्यांच्या दबावाखाली आहे हे दिसून येते,असा आरोप युवक नेते विक्रम ढोणे यांनी केला आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून किसन टेंगले हे कोसारी गावातील हा रस्ता खुला करण्यासाठी लोकशाही मार्गाने प्रशासनाची पत्रव्यवहार करत आहे.परंतु प्रशासन दखल घेत नसल्याने नाईलाजाने युवकांनी रस्ता खुला होईपर्यंत बेमुदत उपोषण किसन टेंगले यांच्या नेतृत्वाखाली चालू केले आहे.ग्रामपंचयतीच्या गाव नं.23 नोंद वहीत नोंद असणारा हा रस्ता आहे.
रस्ता बंद असल्याने गावकऱ्यांना अडचणी निर्माण होत असतानाही हा रस्ता खुला करण्यास कुणाचा दबाव आहे,प्रशासन हे जनतेच्या सोयीसाठी आहे का?पुढाऱ्यांच्या सोयीसाठी हे प्रशासनाने जाहीर करावे,कोसारीतील उपोषणास पाठिंबा व प्रशासनाच्या या कृतीच्या निषेधार्थ जत पंचायत समिती समोर प्रशासनाचा निषेध आंदोलन करणार असल्याचे ढोणे यांनी सांगितले.







