भिवर्गी हद्दीत वाळू तस्करी करणारा ट्रक्टर पकडला | दीड लाखाचा दंड प्रस्तावित |पुन्हा पथक नेमले

0
7



संख,संकेत टाइम्स : संख अप्पर‌ तहसील कार्यालय हद्दीतील बोर नदी पात्रातील वाळू तस्करी रोकण्यासाठी अप्पर तहसीलदार हंणमत म्हेत्रे यांचे पथक नेमण्यात आले आहे.पथक मंगळवारी मध्यरात्री भिवर्गी-तिकोंडी परिसरात गस्त घालत असताना एक ट्रँक्टरमधून बेकायदा वाळू काढताना आढळून आला.पथकांने ट्रँक्टरचा पाटलाग करत पकडण्यात आला आहे. 






ट्रक्टर व वाळूसह सुमारे दीड लाख दंड प्रस्तावित करण्यात आला आहे.

पुर्व भागातील बोर नदीपात्रातील वाळू तस्करी रोकण्यासाठी पुन्हा पथकाचा बागुलबुवा सुरू आहे. मात्र तब्बल 64 किलोमीटर लांब असलेल्या बोर नदी पात्रातील वाळू तस्करी रोकणे अशक्यप्राय आहे.तरीही वरिष्ठ कार्यालयाकडून कानउघाडणी करण्यात आल्याने वाळू तस्करी रोकण्यासाठी रात्रीला पथक नेमण्यात आले आहे. त्यात तलाठी गणेश पवार,पोलीस कर्मचारी इंद्रजित गोदे व कर्मचारी नेमण्यात आले आहेत.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here