जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात राष्ट्रवादी कॉग्रेसचा मोठा जनाधार आहे.तो कायम मिळविण्यासाठी कार्यकर्त्याचे संघटन मजबूत करून गतवैभव मिळविण्यासाठी प्रयत्न करा,असे प्रतिपादन राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष भरत देशमुख यांनी केले.
जत येथील कार्यालयात राष्ट्रवादी युवक कॉग्रेसची बैठक संपन्न झाली.त्यावेळी देशमुख बोलत होते.
यावेळी राष्ट्रवादी वक्ता प्रशिक्षण विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष जयंत भोसले,तालुकाध्यक्ष स्वप्निल शिंदे,इम्रान गवंडीसह युवक कॉग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
देशमुख म्हणाले,कोरोनामुळे देश संकटात आहे, जनतेचे मूळ प्रश्न मागे राहत आहेत. देशाची भाषाच बदलण्याचा प्रयत्न सुरू आहे. तरुण डिप्रेशनमध्ये जात आहेत. असंघटित कामगार, शेतकऱ्यांच्या दुःखात दररोज भर पडत आहे. मराठा समाजापासून तळागाळातील समाजापर्यंत नवे प्रश्न निर्माण होत आहेत.
या वाटा तुकोबांच्या विचाराप्रमाणे प्रकाशमान करण्यासाठी तुमच्या विचारांची आणि त्या विचाराला गती देणार्यांची गरज आहे.त्यामुळे राष्ट्रवादी कॉग्रेसच्या माध्यमातून जनहितासाठी काम करण्याची गरज आहे. त्याचबरोबर पक्ष, पक्षाचे कार्य, पुढील काळात पक्षासाठी कशा प्रकारे काम करता येईल? पक्षात संघटन वाढीसाठी काय करावे लागेल? अशा सर्व विषयांवर देशमुख यांनी मार्गदर्शन केले.
जत येथे राष्ट्रवादी युवक कॉग्रेसच्या बैठकीत बोलताना जिल्हाध्यक्ष भरत देशमुख









