मुलीचे स्वागत होणार ‘लक्ष्मी’च्या पावलांनी | आंवढी ग्रामपंचायत मुलींच्या नावावर ठेवणार पाच हजार रूपयेची ठेव

0
41



आंवढी,संकेत टाइम्स : 

पहिली बेटी धनाची पेटी’ असे म्हणत मुलीच्या जन्माचे स्वागत करण्याऐवजी ‘मुलगी म्हणजे खर्चाला भार’ या विचाराने तिचा जन्मच नाकारण्याची प्रवृत्ती वाढत आहे. परक्याचे धन अशी व्याख्या करून ‘मुलगी नको’ असे म्हणणाऱ्या पालकांनी मुलीच्या जन्माचे स्वागत करावे आणि तिच्या रूपाने घरात लक्ष्मी यावी म्हणून ग्रामपंचायत आंवढी कडून खऱ्याअर्थाने मुलीचा जन्म लक्ष्मीच्या पावलांनी करण्याचा निर्णय घेतला आहे. 







1 एप्रिल 2020 ते‌ 31 मार्च 2021 पर्यत जन्मलेल्या प्रत्येक मुलीच्या नावावर पाच हजार रुपयांची सुकन्या ठेव ठेवण्यात येत आहे.या उपक्रमामुळे खरोखरच आता आंवढीत मुलीचा जन्म ‘लक्ष्मी’च्या पावलांनी होणार आहे.

आंवढी ता.ग्रामपंचायतीने महिला दिनी जिल्ह्यात आदर्श निर्माण करत प्रत्येक मुलींचे जंगी स्वागत करण्याचा निर्णय घेतला आहे.






8 मार्च रोजी होणार जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या अवनी हेल्पो फॉऊंडेशच्या अध्यक्षा बोराडे मँडम म्हणाले,

महिलांनी चूल मुल या पलिकडे जात पुरूषाच्या खांद्याला खांदा‌ लावून प्रत्येक क्षेत्रात सहभाग घ्यावा,महिलांचे रोजगार याविषयी मार्गदर्शन केले.

मुलींचा घटता जन्मदर ही सामाजिक समस्या बनली आहे. पालकांना मुलगी हे आर्थिक संकट वाटत असल्यामुळे तिला जन्मूच द्यायचे नाही हा विचार बोकाळत आहे. 






पण मुलीला शिकवायचे, वाढवायचे आणि लग्नाचा खर्च करून दुसऱ्याच्या घरी पाठवायचे या पारंपरिक विचाराच्या जळमटापुढे, आज मुली शिक्षणाने समृद्ध होऊन आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होत आहेत हे अनेक पालकांना दिसत नाही. विचारानेच विचार बदलता येतात या हेतूने ग्रामपंचायती कडून या अभिनव उपक्रमाला सामाजिक बांधिलकीची जोड दिली आहे.






आंवढीतील नागरिकांसाठी हा उपक्रम असून मुलीच्या 18 व्यावर्षी व्याजासह ठेवीतील रक्कम देण्यात येणार आहे.यावेळी संरपच आण्णासाहेब कोडग,उपसंरपच आण्णासाहेब कोडग,माजी उपसंरपच प्रदिप ‌कोडग,सदस्या मनिषा कुंभार,ग्रामसेविका एस.पी.शिंदे,पंचायत समितीचे श्री.कांबळे,महामुनी,माळी,बचत गटाच्या उषा बाबर,रत्नप्रभा कोडग,शीतल कोडग आशा सेविका व शेकडो महिला उपस्थित होत्या.



आंवढी ता.जत येथे महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रम संपन्न झाला.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here