जत,संकेत टाइम्स : राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी महिला दिनी सादर केलेला अर्थसंकल्प महिलांच्या सक्षमीकरणास आणि त्यांना न्याय देणार आहे.या अर्थ संकल्पात शालेय विद्यार्थीनी पासुन ते घरकाम करणाऱ्या माता भगिनींचा विचार करण्यात आला आहे. त्यामुळे हा अर्थ संकल्प खऱ्या अर्थानी राज्यातील महिलांचे हित जोपासणारा असल्याचे मत राष्ट्रवादी कार्याध्यक्ष उत्तमशेठ चव्हाण व युवक जिल्हा उपाध्यक्ष अशोक कोळी यांनी व्यक्त केले.
चव्हाण व कोळी म्हणाले, आजच्या अर्थसंकल्पात 12 वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व मुलींना मोफत एस. टी. बसची सेवा उपलब्ध करुन दिली आहे. या निणर्यामुळे दुष्काळी,आदिवासी, पाड्यातील, गोर गरीब घरातील आमच्या भगिणींच्या घरात ज्ञानाचा प्रकाश उजळण्यास खुप मोठी मदत होणार आहे. तसेच यापुढे जिजाऊ गृहस्वामिनी योजने अंतर्गत महिलांच्या नांवावर घर खरेदी करणाऱ्यांना खरेदी दराच्या प्रचलित दरात मुद्रांक शुल्कात सुट देण्यात येणार आहे.
त्यामुळे हा निर्णय अतिशय क्रांतीकारी आहे. त्याचबरोबर लॉकडाऊन काळात राज्यातील घरकाम करणाऱ्या महिलांना खुप मोठा आर्थीक फटका बसला आहे. याची गाभीर्याने नोंद ना.अजित पवार यांनी घेतली. त्यांच्यासाठी संत जनाबाई महिला सक्षमीकरणा योजनेची घोघणा करुन दादांनी न्याय दिला आहे. महिला संरक्षणासाठी पोलीस दलात फौज निर्माण करणे आदि घोषणा व त्याची तातडीने अंमलबजावणी केली आहे.
तसेच राज्यातील सिंचन क्षमतेमध्ये वाढ व्हावी यासाठी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी जलसंपदा विभागासाठी रु. 12,951 कोटी रुपयांची अर्थसंकल्पामध्ये तरतुद करुन घेतली आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील जत तालुक्याला म्हैशाळ विस्तारीत योजनेला 100 टक्के फायदा होऊन कामाला गती मिळेल व दुष्काळी जत तालुक्याचे नंदनवन होईल.
यावेळी नगरसेवक स्वप्नील शिंदे,हेमंत खाडे, पवन कोळी, हेमंत चौगुले, संतोष देवकर, रुपेश पिसाळ, जयंत भोसले, सागर चंदनशिवे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थीत होते





