कोलकाता : पश्चिम बंगालमधील राजकारणाचा पारा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चांगलाच चढलाय. सत्ताधारी तृणमूल काँग्रेसपासून पासून आपलंच सरकार येणार असा दावा करणाऱ्या भाजपपर्यंत सर्वच पक्षांनी प्रचाराचा धुराळा उठवलाय. अभिनय क्षेत्रातील दिग्गजांच्या एन्ट्रीने पश्चिम बंगाल निवडणुकीत चांगलाच रंग भरलाय. भाजपने अनेक सिनेकलाकारांना पक्षात घेतलंय. त्यातच प्रसिद्ध मिथूूून चक्ररवर्ती यांचाही भाजप प्रवेश झाल्याने चर्चेला उधाण आलंय. विशेष म्हणजे आधी ममता बॅनर्जी यांचे निकटवर्तीय आणि त्यांच्याच बळावर संसदेत पोहचणाऱ्या मिथुन यांच्या भाजप प्रवेशाने निवडणूक प्रचाराला वेग आलाय. मात्र, ममता बॅनर्जी यांचे निकटवर्तीय मिथुन चक्रवर्ती यांनी भाजपमध्ये प्रवेश का केला याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.