जत,संकेत टाइम्स : जत शहरामध्ये महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह उभारून खऱ्या अर्थाने महिलांचे रक्षण करून महिलांचा सन्मान करावा,अशी मागणी युवा नेते विक्रम ढोणे यांनी जिल्हाधिऱ्यांना निवेनाद्वारे केली आहे
या निवेदनात म्हटले आहे की, जत शहराची लोकसंख्या सुमारे 60 हजाराच्या पुढे असून,शहर हे तालुक्याचे ठिकाण असून याठिकाणी मुख्य बाजारपेठ असल्याने तालुक्यातील ग्रामीण भागातील लोकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते,भाजी विक्रेते, फळ विक्रेते,हात गाडीवाले,पेंशनर, ज्येष्ठ नागरिक यांचा कामानिमित्त जत मध्ये येणे जाणे असते.पण जत शहरामध्ये महिलासाठी एकही स्वतंत्र स्वछतागृह नाही तसेच पुरुषासाठी फक्त तीन स्वच्छतागृहे असून तेथेही घाणीचे साम्राज्य आहे.
त्यामुळे नागरिकांची, महिलांची,ज्येष्ठ नागरिक, शेतकरी, व्यापारी,यांची मोठ्या प्रमाणावर अडचणी येत आहेत.यापूर्वी जत नगरपरिषदकडे सातत्याने निवेदन देऊन मागणी केली आहे.पण नगरपरिषद प्रशासन दुर्लक्ष करत आहे,विशेष म्हणजे नगराध्यक्षासह नगरपरिषदेच्या सभागृहात 50 टक्के महिला असताना सुद्धा या महिलांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिले जात नाही म्हणून जिल्हाधिकारी या नात्याने आपण व्यक्तिशः लक्ष घालावे 8 मार्च महिलादिनी महिलांचे रक्षणासाठी पुढाकार घेऊन महिला मुताऱ्या उभ्या करून महिलांचा सन्मान करावा.






