डफळापूर, संकेत टाइम्स : भारताच्या सैन्य दलात आपले जवान आपल्या जीवाची पर्वा न करता सिमाचे रक्षण करतात,म्हणून देशातील नागरिक सुरक्षित आहेत.प्रत्येक दलातील सैनिकाचे कार्य गौरवास्पद आहे, असे प्रतिपादन पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण यांनी व्यक्त केले.
डफळापूर येथील राजू भगवान माने हे भारतीय सैन्यदलातून सुभेदार पदावरून निवृत्त झाल्याबद्दल त्यांचा लोकनेते सुनिलबापू चव्हाण युथ फांऊडेशनच्या वतीने सन्मानपत्र,शाल,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
त्यावेळी चव्हाण बोलत होते.
यावेळी जिल्हा बँकचे व्यवस्थापक जयराज शिंदे,खा.संजयकाका पाटील याचे स्वीय सहाय्यक मोहन भोसले, संकेत टाइम्सचे संपादक राजू माळी,कॉ. हंणमत कोळी,साहेबराव भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
चव्हाण पुढे म्हणाले,सैन्यदलातील प्रत्येक जवानाचे कार्य स्मरण ठेवून त्यांचा समाजातील प्रत्येक घटकांनी सन्मान ठेवण्याची गरज आहे. यापुढे लोकनेते सुनिलबापू चव्हाण युथ फांऊडेशनच्या माध्यमातून माजी सैनिकांना मदत करत राहू,असेही चव्हाण यांनी सांगितले.
डफळापूर येथील माजी सैनिक राजू माने यांचा सेवानिवृत्तीबद्दल सत्कार करण्यात आला.








