आटपाडीच्या चोरट्यासह पावनेतीन लाखाचा मुद्देमाल जप्त

0
4



सांगली : सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात विविध ठिकाणी चोरी,घरफोडा करणाऱ्या एका संशयिताला ताब्यात घेत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांने 2 लाख 89 हजार 680 रूपयाचा चोरीतील माल जप्त केला.देवगण उर्फ देव्या बापू पवार (वय 19,रा.सरकारी दवाखान्या आटपाडी)याला ताब्यात घेतले आहे.






आटपाडी तालुक्यातसह माळशिरस पोलीस ठाणे हद्दीत देव्या पवार व त्यांच्या 7 साथीदारांनी घरफोडीसह पिलीव घाटात एसटी बस लुटण्याच्या उद्देशाने दगडफेक केली होती.तेव्हापासून दिव्या पवार फरार होता.गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकलही चोरीची आहे.दरम्यान संशयिताकडूनही आणखीन गुन्हे उघडीस येण्याची शक्यता आहे.






आटपाडी येथील घरफोडीतील संशयिताकडे सापडलेले चोरीतील दागिणे

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here