जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात तूफान सुरू असलेल्या मटका,जूगारचा पुन्हा एकदा विधानसभेत आवाज उठला.जतचे आमदार विक्रमसिंह सावंत जत तालुक्यात मटका,जूगारमुळे तरूण पिडी बरबाद होत असल्याचे निदर्शनास आणून देत जतेत उद्योग, व्यवसायाची गरज असल्याचे सांगितले. पोलीसांनी ते रोकण्यासाठी आणखीन प्रभावी कामगिरी करावी,अशी मागणीही विधानसभेत केली.
यानिमित्ताने जत तालुक्यातील पोलीसाच्या छूप्या पांठिब्यामुळे मटाक,जूगारसह अवैध धंदे सुरू आहेत.हे पुन्हा स्पष्ट झाले आहे. जत तालुक्यात कोणताही अधिकारी येऊदेत,त्यांना मुर्दाड झालेली खालची यंत्रणा जतचे पाणी दाखविल्या शिवाय सोडत नाही।आताही तसेच झाले आहे.जत पोलीस ठाण्याचे नवे अधिकारी मटका,जूगार व अन्य अवैध धंद्ये सुरू करण्याचे मनस्थितीत नव्हते.त्यामुळे अनेक महिने अवैध धंदे चालक दबून होते.मात्र ठाण्याची खालची यंत्रणा इतकी मुर्दाड झाली आहे की ते वरकमाई शिवाय जगूच शकत नसल्याचे वास्तव आहे.
त्यामुळेच नव्या अधिकाऱ्यांना जतचे पाणी दाखवत खालच्या कर्मचाऱ्यांनी योग्य मध्यस्ती करून पुन्हा मटका,जुगारला राजाश्रय दिला आहे. अगदी खुलेआम खोकी टाकून जतेत मटका,जुगार,दारू अड्डे फोफावले आहेत.यापुर्वी तत्कालीन आमदार विलासराव जगताप यांनी पोलीस किती हप्ते घेतात व कसे अवैध धंदे सुरू आहेत.यांची पोलखोल विधानसभेत केली होती.त्यानंतर पुन्हा त्यावर मोहोर लागली आहे.
नोटीस देताना पैशाची मागणी
जत पश्चिम भागातील काही कर्मचारी नोटीसा देतानाही पैशाची मागणी करत असल्याचे आरोप आहेत.
नोटीस देण्यासाठी मोठी गाडी घेऊन संबधित तक्रारदाराच्या दारात जाऊन भिती दाखवत पैसे उकळण्यात एक कर्मचारी तरबेज आहे.अनेक दिवसापासून त्या कर्मचाऱ्यांला वरिष्ठ अधिकाऱ्यांचा राजाश्रय मिळाल्याची चर्चा आहे.असे प्रकार पोलीस दलाला शोभनीय नाहीत.वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गाभिर्यांने लक्ष देण्याची गरज आहे.
पोलीसाचे कौतुक
जत,उमदी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात चांगले काम केले आहे,मात्र दोन्ही ठाण्याकडे कर्मचारी कमी असल्याने कायदा-सुव्यवस्था आबाधित ठेवण्यात मोठ्या अडचणी येत आहेत. त्यासाठी नवे कर्मचारी द्यावेत,अशी मागणीही आ.सावंत यांनी विधानसभेत केली.









