जत,संकेत टाइम्स : उटगी ता.जत येथील काका मल्लाप्पा दुंडाप्पा केसगोंड यांच्या खूनप्रकरणी संशयित पुतण्या भालचंद्र सिध्दाप्पा केसगोंड याला उमदी पोलीसांनी जत न्यायालयात उभे केले असता त्याला 10 मार्चपर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे.
जमिनाच्या वादातून मल्लाप्पा केसगोंड यांच्या दुचाकीला टेम्पो चालक असलेल्या भालचंद्र केसगोंड यांने टेम्पोने पाठीमागून धडक देत खून केल्याचा प्रकार समोर आला आहे.घटनेनंतर फसार झालेला पुतण्या भालचंद्र याला अखेर उमदी पोलीसांनी अटक करत न्यायालयात हजर केले होते.पुढील तपास सा.पो.नि.दत्तात्रय कोळेकर करत आहेत.






