जत,संकेत टाइम्स : एकीकडे सरकार कर्नाटकातील गावे महाराष्ट्रात येत असल्याची घोषणा करते,तर दुसरीकडे त्याउलट जत तालुक्यातील 48 गावे पाणी मिळत नाही, म्हणून कर्नाटकात जाण्याची परवानगी मागतात हि दुर्देवी बाब आहे,अशी माहिती आमदार गोपिचंद पडळकर यांनी दिली.
जत पुर्व भागातील 48 गावासाठी जलसंपदा विभागाने नवीन योजना आणून सिंचनासाठी पाणी द्यावे,अशी मागणी आमदार गोपिचंद पडळकर यांनी विधानसभेत केली.
दरम्यान मंगळवेढा,सोलापूरमधील काही गावातील सिंचन योजना राबविण्याची मागणी आ.पडळकर यांनी केली.






