जत,संकेत टाइम्स : एकीकडे देशातील काही भागांत कोरोनाच्या रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली असतानाच दुसरीकडे सरकारने सर्वसामान्यांचे कोरोना लसीकरण करण्यास सुरुवात केली आहे.1 मार्चपासून देशभरातील 60 वर्षांवरील नागरिक आणि 45 वर्षांवरील सहव्याधी असलेल्या व्यक्तींना लस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
दरम्यान बुधवार जत तालुक्यात सर्वसामान्याना कोरोनाचे 4 केंद्रात लसीकरण सुरू करण्यात आले.पहिल्या दिवशी बिळूर 62,डफळापूर 58,उमदी 20,संख 15 असे एकूण 155 नागरिकांनी लस टोचून घेतली






