मुंबई : विरोधी पक्षाकडून प्रचंड दबाव वाढल्यामुळे पुजा चव्हाण मृत्यू प्रकरणात अखेर वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिला आहे.
हेही वाचा..
दुचाकीवरून गेलेल्या तहसीलदारांनी दिला वाळू तस्करांना दणका | 5 वाहने जप्त |
वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेत संजय राठोड यांनी कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द केला.संजय राठोड पत्नी शीतल आणि मेहुणे सचिन नाईक यांच्यासह चर्चगेट निवासस्थानाहून अडीच वाजण्याच्या सुमारास वर्षा बंगल्यावर गेले होते.
त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं.सांयकाळी महाआघाडीच्या बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे आपली भूमिका मांडण्याची शक्यता आहे.







