जत,संकेत टाइम्स : कोरोनाचा प्रभाव राज्यभरात झपाट्याने वाढत असतानाही जत पोलीस जतेत कोरोना रूग्ण वाढ होण्याची वाट पाहत आहेत काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.जिल्हाधिकारी यांचे कोरोनाबाबत कडक आदेश असतानाही विना मास्क गायब झाला आहे. व्यापारी पेठेत सोशल डिस्टसिंग पाळले जात नाही.इतके होत असताना जत पोलीसाकडून कोणतीही कारवाई होत नाही.नगरपरिषद झोपेत आहे.त्यामुळे जत शहरात सर्वत्र अलबेल आहे.अशाने कोरोना वाढीला बंळ दिले जात आहे.गतवेळचा अनुभव लक्षात घेता,प्रशासनाकडून दक्षता घेण्याची गरज आहे.
हेही वाचा : नगरपरिषदेचा अर्थसंकल्प बारगाळला
जत तालुक्यात कोरोनाचा प्रभाव अद्यापही नियंत्रणात असून गेल्या दोन दिवसात फक्त एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे.
बुधवारी एकही रुग्ण आढळला नाही,तर गुरूवारी जत शहरात फक्त 1 रुग्ण आढळून आला आहे.
विदर्भात वाढलेल्या कोरोना रुग्णाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव ओसरलेला आहे.भविष्यात रुग्ण वाढू नयेत यासाठी प्रशासनाकडून काळजी घेतली जात आहे. सर्व गर्दी होणारे कार्यक्रम प्रशासनाकडून रद्द करण्यात आले आहेत.उमदी पोलीस अलर्ट झाले आहेत.त्यांच्याकडून प्रमुख गावात विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.






