जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात सोमवारी नवे तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
तालुक्यात सातत्याने नवे रुग्ण आढळून येत आहेत.बाहेरून आलेल्या नागरिकांचा बाधित रुग्णाचा समावेश आहे.सोमवारी जिल्ह्यातही 11 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण सापडले आहेत.जत तालुक्यातील शेगावमध्ये 2,व तिप्पेहळ्ळीत 1 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे.
जतसह जिल्हाची स्थिती अजूनही नियंत्रणात आहेत.नागरिकांनी मास्कचा वापर व सोशल डिस्टसिंग कडकपणे पाळण्याची गरज आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेल्याने अनेक श हरे,शाळा लॉकडाऊन करण्यात आल्या आहेत. तशी परिस्थिती उद्भवू नये,यांची काळजी नागरिकांनी घ्यावी,असे आवाहन करण्यात येत आहे.







