जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील मोठ्या प्रमाणात असलेल्या दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य भाव मिळेल.तालुक्यातील शेतकऱ्यांची पिळवणूक यापुढे थांबेल,असे प्रतिपादन आमदार विक्रमसिंह सांवत यांनी केले.
आमदार सांवत यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या श्री.दानम्मादेवी जत तालुका शेतकरी सहकारी दुध संघ मर्या.जतच्या दुध संकलनास तिप्पेहळ्ळी येथून सुरूवात करण्यात आली.
या संघाच्या पहिल्या संकलन केंद्राचे उद्घाटन जिल्हा दुग्ध व्यवसाय अधिकारी अरूण चौगुले यांच्याहस्ते संपन्न झाले.
वरिष्ठ लेखाधिकारी उच्च शिक्षण कोल्हापूर रणजित झपाटे,सहाय्यक निबंधक सहकारी संस्था बाळु पाटील,तालुका.पशु वैद्यकीय अधिकारी डाॅ.जवणे,दुध संघाचे उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य महादेव आण्णा पाटील,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आप्पाराया बिराजदार,माजी सभापती बाबासाहेब कोडग आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
आमदार सांवत पुढे म्हणाले, जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात दुग्ध उत्पादक शेतकरी आहेत.शेतीला जोड धंदा म्हणून आमचे शेतकरी व्यवसायिक दुध व्यवसाय करतात.तालुक्यात सहकारी दुध संघ नसल्याने यापुर्वी बाहेर जिल्ह्यातील दुध संघांना दुध घालावे लागत होते.त्यांच्याकडून तालुक्यातील शेतकऱ्यांची गळचेपी होत होती.ते पाहून आम्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून या दुध संघाची स्थापना केली आहे. हा दुध संघ सभासदाच्या मालकीचा असणार आहे. येथे योग्य भाव,योग्य वजन,योग्य फँट यांची खबरदारी घेतली जाणार आहे.
तरीही शेतकऱ्यांच्या काहीही समस्या असतील तर त्या थेट मला कळवाव्यात त्या समस्या तातडीने सोडविण्यात येतील. शेतकऱ्यांना फायदा होईल,असाच या दुध संघाचा कारभार असेल.आपल्या हक्काच्या असलेल्या दुध संकलनास शेतकऱ्यांनी दुध घालावे,असे आवाहनही आ.सांवत यांनी केलेे.
यावेळी बाज गावचे युवा नेते आरविंद गडदे,माजी पंचायत समिती सदस्य कुडलिंक सरगर,पोलिस उपनिरीक्षक उत्तम जाधव,शिंगणापूर युवा नेते दादाशेठ पांढरे,सर्व संचालक मंडळ व कर्मचारी वर्ग,शेतकरी बांधव उपस्थित होते.
जत तालुक्याच्या हक्काच्या असलेल्या या संघास पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिला.पहिल्या दिवशी 11,000 हजार लिटर दुध संकलन झाले आहे.
तिप्पेहळ्ळी ता.जत येथे दानम्मादेवी दुधसंघाचे दुध संकलन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.