नवे डांबरीकरण वाहनांच्या चाकांना चिटकून उचटले | भ्रष्ट अधिकाऱ्यांचा कारभार उघड ; भ्रष्ट साखळीने 50 कोटीचा निधीची लावली वाट

0
4



जत,संकेत टाइम्स : जत शहरासह तालुक्यातील रस्त्याच्या कामातील भ्रष्टाचाराची चौकशी करून संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरीकांतून होत आहे.

जत शहरासह तालुक्यातील रस्त्याच्या कामासाठी तसेच रस्त्याच्या दुरुस्तीसाठी कोट्यवधींचा निधी खर्च करण्यात आला आहे. रस्त्याचे काम झाल्यानंतर काही महिन्यातच खड्डे पडले आहेत.सर्वच  रस्त्याच्या कामात मोठा घोटाळा झाला.जत शहर,जत सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद,पालिकेतील बांधकाम विभागाने रस्त्याचे मोठ्या प्रमाणात कामे केली. परंतु, काही दिवसांत रस्त्यांमध्ये मोठे खड्डे पडले असून, संपूर्ण जत शहर सध्या खड्ड्यात आहे.






नव्याने केलेल्या सर्वच रस्त्याच्या कामात ठेकेदाराने डांबर खाल्ले तर अधिकाऱ्याने मलिदा खाल्ला, असा आरोप होत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या तालुक्यातील रस्ते 

त्रयस्ट यंत्रणेकडून तपासणी करून संबधित अधिकाऱ्यांची पोलखोल करावी,अशी मागणी होत आहे.







 चार-आठ दिवसात खड्डे


जत तालुक्यात गेल्या वर्षभरात केलेल्या रस्त्यात अधिकारी,ठेकेदारांच्या भष्ट्र साखळीने डांबर,निधी खाला आहे.वर्षभरात केलेले सर्वच रस्त्यावर खड्डे पडले आहेत.त्यापेक्षा कहर झाला असून गेल्या महिन्यात झालेल्या रस्त्यावरील नवे डांबरीकरण वाहनाच्या चाकांना चिकटून गायब झाले आहे.त्यामुळे नवे रस्त्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाला आहे.








जतच्या ठिय्या मांडलेल्या मुर्दाड अधिकारी भ्रष्ट कारभाराचा धनी


जत तालुक्यातील बांधकाम विभागात गेल्या अनेक वर्षापासून ठिय्या मांडलेला अधिकारी व कनिष्ठ अभिंयत्याने जतच्या रस्त्याचा निधी ठेकेदारांच्या मदतीने फस्त केला आहे.त्यामुळे तालुक्याचे मोठे नुकसान झाले आहे तर अधिकारी,अभियंते मालामाल झाले आहेत.त्यांनी केलेल्या पापामुळे सामान्य नागरिकांच्या कमरेचे बेहाल झाले आहे.अधिकारी,अभियंत्याच्या मालमत्तेची चौकशी करावी,अशी मागणी होत आहे.



जत तालुक्यात नवे रस्ते अगदी दोन दिवसात असे उखडले आहेत.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here