करजगी,संकेत टाइम्स : करजगी (ता.जत) येथील विवाहित महिलेने पेटवून घेत आत्महत्या केली.सौ.ज्योती महादेव पट्टणशेट्टी (वय 35, रा.करजगी) असे मयत विवाहितेचे नाव आहे.घटना गुरूवारी सकाळी 7 च्या सुमारास घडली.याबाबत उमदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी,महादेव पट्टणशेट्टी हे पत्नी, मुलासह करजगी पासून पुर्वेकडे अर्धा किलोमीटर अंतरावर शेतात राहतात.गुरूवारी सकाळी सातच्या सुमारास ज्योती यांनी किरकोळ कारणावरून डिजेल अंगावर ओतून पेटवून घेतले.नातेवाईकांनी आग विजवली मात्र ज्योती त्यात ज्योती सुमारे 70 टक्के भाजल्या होत्या.तातडीने त्यांना सांगली येथे उपचार्थ दाखल केले,मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मुत्यू झाला.
शुक्रवारी मृत्त ज्योतीच्या नातेवाईकांनी उमदी पोलीसात फिर्याद दिली.दरम्यान पोलीसांनी घटनास्थळी पंचनामा केला.आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.ज्योती यांच्या पश्चात पती, दोन मुले असा परिवार आहे.अधिक तपास सा.पो.दत्तात्रय कोळेकर करत आहेत.