चिंचणी,सौदत्ती यात्रेमुळे महाराष्ट्राची धास्ती वाढली | कोरोनाचा प्रसार वाढण्यास बळ मिळण्याची शक्यता ; भाविक काळजी घेणार का ?, शासनाच्या निर्णयाकडे लक्ष

0
11



जत,संकेत टाइम्स : कर्नाटक सरकारने लाखो भाविकांचे उपस्थितीत भरणारी बेळगाव जिल्ह्यातील श्री.क्षेत्र चिंचणी मायाक्का व श्री.क्षेत्र सौदत्ती रेणुका  देविची यात्रा रद्द न करता त्याला परवानगी दिल्याने सांगली, सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या वाढण्याच्या शक्यता बळावली आहे.यामुळे दोन्ही जिल्ह्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे. 

कोरोनाचे पार्श्वभूमीवर महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश,गोवा या राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान,नवसाला पावणारी देवी म्हणून प्रसिद्ध असलेल्या कर्नाटक राज्यातील चिंचली येथील श्री.मायाक्का देविची व सौंदत्ती येथील श्री.रेणुका देवीची यात्रा कोरोनाचा प्रभाव असतानाही रद्द न केल्याने मोठे संकट ओढावले आहे.







या यात्रेला सांगली, सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील भाविक मोठ्या संख्येने जातात.त्यामुळे यात्रेत‌ होणारी गर्दी मुळे कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता असल्याने महाराष्ट्र सरकारचे दाबे दणाणले आहे.

सद्य परिस्थितीत भारतासह अनेक देशानी कोरोनावर मात करण्यासाठी लसीची निर्मिती केली आहे.जगभर कोरोनाची लस देण्यात येत आहे. तरीही कोरोना प्रभाव कमी होण्याचे नाव घेत नसल्याने भिती कायम आहे.भारतासह अनेक देशांत कोरोनाच्या दुसरी लाटेने प्रवेश केला असून ही कोरोनाची महामारी पहिल्या महामारी पेक्षा गंभीर समजली जात आहे. 







राज्यातील जनतेला महाराष्ट्रातून कोरोना ही महामारी हद्दपार झाली आहे,असा साक्षात्कार झाल्याने राज्यातील जनतेने कोरोनाचे बाबतीत असलेले नियम पायदळी तुडविले आहेत.याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्रातील अनेक महानगरामध्ये कोरोनाने परत शिरकाव झाला असून यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात कोरोनाचे पार्श्वभूमी वर हाॅटस्पाॅट जाहीर करण्यात आले आहे.या जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून कठोर नियम लावण्यात आले आहेत.तर काही जिल्ह्यात जमावबंदीचा आदेश लागू केले आहेत. 







अशी परिस्थिती असताना व पुणे , मुंबई या ठिकाणी कोरोनाचे रूग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत अशा परिस्थितीत कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील श्री. क्षेत्र चिंचणी मायाक्का व श्री. क्षेत्र श्री. सौंदत्ती रेणुका देवीच्या आठदहा लाख भाविकांचे उपस्थितीत पार पडणारे यात्रेला कर्नाटक सरकारने परवानगी दिल्याने या यात्रेमुळे महाराष्ट्र राज्याची चिंता वाढली आहे. 







त्यातच मोठा भाविक वर्ग असलेली चिंचणी येथील श्री.मायाक्का व सौंदती येथील श्री.यलम्मा देवीची यात्रा भरत असल्याने भिती व्यक्त आहे.यात्रेत पुणे व मुंबई येथून भाविक हे खासगी ट्रॅव्हल, महामंडळाचे बसने तसेच रेल्वे व आपअपल्या खासगी वाहनाने येणार असल्याने कोरोनाचे बाबतीत असलेल्या नियमांचे यात सोशल डिस्टन्सिंगचे पालन, तोंडाला मास्क लावणे, सॅनिटराइजचा वापर हे करणे शक्य होणार नाही. त्यामुळे कोरोनाचा प्रसार रोखणे अशक्य होऊन कोरोना वाढणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून महाराष्ट्र सरकार व प्रशासन याबाबतीत काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here