ढोणे नामक सूर्याजी पिसाळापासून धनगर समाजाने सावध राहावे ; भाऊसाहेब दुधाळ

0
5



जत,संकेत टाइम्स 

———————-

बहुजन नायक गोपीचंद पडळकर आमदार झाल्यापासून पहिल्यांदाच बहुजनाचे प्रश्न सभागृहात मांडले. बहुजन समाजाला न्याय देण्याचे काम केले. राज्यभर आरक्षणाचा लढा उभा करून आदिवासी समाजाला ज्या योजना चालू आहेत. त्या 22 योजना लागू करण्यात यश आले. यामुळेच प्रस्थापित व्यवस्थेने महाराष्ट्रात अनेक धनगर समाजातील बिकावू दलाल निर्माण केले आहेत. या दलाला मार्फत पडळकर यांच्यावरती चिखलफेक करण्याचे काम सोपवले आहे.






असाच एक दलाल, धनगर समाजातील सूर्याजी पिसाळ विक्रम ढोणे यांच्यापासून धनगर समाजाने सावध राहावे,असे आवाहन युवा नेते भाऊसाहेब दुधाळ यांनी केले

दुधाळ पुढे‌ म्हणाले दि.12 फेब्रुवारी 2021 ला जेजूरी येथे आमदार गोपिचंद पडळकर यांनी “जेजूरी गडावर” नियोजीत अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण सामान्य मेंढपाळ यांच्या हातुन केले. यामुळे अनेकांच्या पोटात गोळा उठला. अहिल्यादेवी पुतळ्यांची विटंबना केली. धुडगूस घातला अशा प्रकारची व्यक्तवे केली. जतमधील धनगर समाजाला कलंक असणारा, सूर्याजी पिसाळ विक्रम ढोणे  “अहिल्यामतेच्या पुतळ्याची विटंबना केली”म्हणून आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर आरोप करतो,हे निषेधार्थ आहे.






हा ढोणे नामक व्यक्ति कोन आहे,त्याचे उद्योग काय ? विटंबना या शब्दाचा निट अर्थ ढोणेला कळाला आहे का ? प्रशासनाच्या उपस्थितीत गोंधळ, आदळ आपट, मोडतोड, तोडफोड, जाळपोळ इत्यादी बाबीचा समावेश होतो. येथे असे काहीच घडले नाही. तर अहिल्यादेवीच्या पुर्णाकृती पुतळांना आदरपूर्वक, सन्मानपुर्वक पुष्पहार अर्पन करने , त्यांच्या चरणी नतमस्तक होणे, वाद्यांचा नांदात अहिल्यामातेचा जय घोष करने याला विटंबना हा ढोणे कसा काय समजतो ?  यांचे डोके ठिकाणावर आहे का??? हा ढोणे म्हणजे धनगर समाजातील सूर्याजी पिसाळ आहे. कोणाच्या इशारावर आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वर ‘टिकाटिप्पणी’ करत‌ आहे ??उपेक्षित, वंचित, पिडित, अन्यायग्रस्त लोकांना मदत करून उचित न्याय देण्यासाठी ते सतत झटतात. 






जात पात धर्म न बघता आमदार झाल्यावर पूण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापिठ, मुंबई शहरास रूग्नवाहिका देणे,वाफगांव येथिल महाराजा यशवंतराव होळकर यांच्या जन्मस्थळी जाऊन किल्याच्या डागडूजीस 25 लाख देणे,बहिर्जी नाईक या महापराक्रमी व हरहून्नरी महापुरूषांच्या “समाधी स्थळास”50 लाख तर,जिवा महाला वीर महापुरुषांचे “समाधीस्थळ” सुशोभीकरणास 25 लाख तर अहिल्यादेवी होळकर विद्यालय सांगली विद्यालयास 10 लाख देऊन 6 वर्षात कोटी च्या वर मदत करण्याचे आश्वासन देणे. तर जालना येथील पिडीत मृत्यक कुटूंबास 50 हजाराची आर्थिक मदत दिली. सर्वात महत्वाचे म्हणजे धनगर एसटी न्यायालयीन लढ्यास 12 लाख देऊन खूप मोठे सामाजिक योगदान दिले.






संपूर्ण महाराष्ट्रात गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या कृत्याला समर्थन मिळत आहे. असे असताना समाजाचा फितूर ढोणे हा अहिल्यादेवी होळकर यांचे वशंज राजे भूषणशिंह होळकर आणि गोपीचंद पडळकर यांचावर टिकाटिपणी करतोय. त्यांनी आधी आपल्या बुढाखाली किती अंधार पसरला आहे हे पहावे. ढोणे 

यांनी प्रस्थापितांची दलाली करू नये. अन्यथा यांचे परिणाम भोगावे लागतील अशा इशाराही भाऊसाहेब दुधाळ यांनी दिला आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here