अतिक्रमण हटवाची मोहिम राबवा |संखसारखी कर्तव्यदक्षता बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी जतेत दाखवावी

0
5



जत‌,संकेत टाइम्स : जत शहरातील प्रमुख रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने संख सारखा पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

जत शहरातील प्रमुख रस्ते असलेले जत-सांगली,शेगाव चौक ते यल्लमा रोड,भारतीय स्टेट बँक समोरील रोड,उमराणी रोड,निगडी रोडवर अतिक्रमणे करून मोठ्या प्रमाणात रस्ताच अतिक्रमण धारकांनी गायब केला आहे. अगदी रस्त्याला ठासून असलेली अतिक्रमणे याचं रस्त्यावरून जाणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिस‌त नाहीत हे विशेष आहे.महत्वाचा असणाऱ्या छत्रपती संभाजी चौक ते सांगली रस्त्याच्या कडेला दररोज नवीन खोकी धारक अतिक्रम करत आहेत.








या मार्गावर असणाऱ्या शासकीय कार्यालया समोरील थेट रस्त्यावरच ठासून हॉटेल व्यवसायिकांनी अतिक्रमणे करून विद्रुपीकरण केले आहे.हे सर्व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उघड्या‌ डोळ्याने बघत आहेत.मात्र कारवाई करत‌ नाहीत.त्यामुळे रस्त्यावर थाटलेल्या दुकानामुळे रस्ता धोकादायक बनला आहे.संख स्टँड परिसरातील अतिक्रमने काढून कर्तव्यदक्षता दाखविलेले सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांनी जतेत धडक कारवाई करून रस्ते मोकळे करावेत, अशी मागणी होत आहे.



Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here