जत,संकेत टाइम्स : कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी आरोग्य यंत्रणेबरोबरच ‘फ्रंट लाईन वॉरिअर्स’ म्हणून पोलिसांनीही सेवा बजावली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेपाठोपाठ सोमवार जत पोलिसांनाही कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली.
जत शहरातील ग्रामीण रुग्णालयात जत पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात आली आहे. पुढे सर्वच पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येणार आहे.
जत पोलीसांना कोरोना लस देण्यात आली.






