29 ग्रामपंचायतीचे‌ संरपच,उपसंरपच आज ठरणार | बड्या नेत्याकडून हालचाली

0
8



जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यातील 29 ग्रामपंचायतीच्या संरपच व उपसंरपच निवडी आज होत आहेत.

उमराणी ता.जत येथील नागरिकांनी आरक्षण विरोधात‌ उच्च न्यायालयात धाव घेतल्याने 9 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या संरपच निवड पुढे ढकलण्यात आल्या होत्या.दरम्यान आज‌ मंगळवार ता.16 रोजी तालुक्यातील उमराणी होणाऱ्या‌ 29 ग्रामपंचायतीच्या संरपच,उपसंरपच निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत.आज‌ सकाळी 11 वाजता‌ निवडणूक‌ प्रक्रिया सुरू होणार आहे.





तालुक्यातील शेगाव,अंकले,उटगी,

गुड्डापूर,वळसंग,तिकोंडी आदी महत्वाच्या गावातील संरपच‌ निवडी रंगतदार होणार आहेत.अनेक गावात काटावर बहुमत असणाऱ्या ग्रामपंचायतीत ‌मोठा संघर्ष दिसत‌ आहे.इच्छूकांनी सदस्यांना सहलीवर पाठविले आहे.आज सकाळी सदस्य परत येणार आहेत.




भाजपा, कॉग्रेसच्या वरिष्ठ नेत्याचे लक्ष;

जत तालुक्यातील वर्चवासाठी कॉग्रेसचे आमदार विक्रमसिंह सांवत, भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप,राष्ट्रवादीचे नेते सुरेशराव शिंदे,तालुकाध्यक्ष रमेश पाटील,उत्तम चव्हाण लक्ष ठेवून आहेत.




ग्रामपंचायतीत पक्षीय राजकारणापेक्षा गटाच्या राजकारणांना महत्व असते.जास्तीत जास्त ग्रामपंचायतीत आपले समर्थक संरपच,उपसंरपच‌ व्हावेत यासाठी तालुक्यातून सोमवारी रात्रीपासून यंत्रणा हलल्या आहेत.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here