माडग्याळजवळ अपघातात बेळोंडगीचा तरूण मोटरसायकल स्वार ठार | दोघे गंभीर जखमी

0
25



माडग्याळ, संकेत टाइम्स : माडग्याळ (ता.जत)इसार पेट्रोल पंपाच्या जवळ मालवाहतूक करणारी बोलोरो पिकअप गाडी मोटर सायकलीवर उलटल्याने खाली सापडून मोटार सायकल स्वार जागीच ठार तर दोघेजण गंभीर जखमी झाल्याची ह्रदयद्रावक घटना दुपारी चारच्या दरम्यान घडली आहे.





नागाप्पा आमसिद्धा हात्तळ्ळी (वय 35, रा.बेंळोडगी)असे ठार झालेल्या मोटारसायकल स्वाराचे नाव आहेतर 

त्यांचे वडील आमसिध्दा हात्तळ्ळी गंभीर जखमी झाले आहेत.

पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी की,माडग्याळ येथून बुलोरा पिकअप(एमएच 09, इएम 8871)  ही गाडी ही व्हसपेठ गावाकडे निघाली होती, मोटार सायकल स्वार(एमएच 10,एल 8273) वरून जतकडून बेळोंडगीकडे निघाले होते.माडग्याळ जवळच्या अंबाबाई मंदिरानजिक पिकअपचे एक्सेल तुटल्यामुळे वेगात आसणाऱ्या पिकअपने समोरून येणाऱ्या मोटारसायकलला जोराची धडक देत पिकअप मोटार सायकलीवर पलटी झाली.त्यात मोटारसायकल स्वार नागेश धर्मराया हात्तळी याच्या अंगावर पिकअप  पडल्याने ते जागीच ठार झाले.






तर त्यांच्या सोबत असणारे गुरू मलकरी हात्तळी हे बालाबाल बजावले मात्र त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. बेंळोडगी येथील हे दोघेजण जतला शेतीच्या कामासाठी गेले होते, जतमधील कामे आटोपून ते बेंळोडगीकडे निघाले होते. माडग्याळ जवळ येताच बोलोरो गाडी समोरून येऊन मोटरसायकलवरच पलटी झाली यामुळेच हा अपघात घडला.पिक वाहनाचे टेरिंग जॉईंट तुटल्याने अपघात झाल्याचे समजते.मयत नागाप्पा हात्तळी हे ट्रॅक्टर ड्राइवर होते.त्याच्या पश्चात पत्नी, तीन मुली आहेत. अपघात स्थळी उमदी पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय कोळेकर,हवालदार राम बनेनवर,विक्रम घोदे,बसवराज कोष्टी यांनी पंचनामा केला.










व्हसपेठ व माडग्याळ रस्त्यावर मोटारसायकल व बोलेरो पीकअप अपघातातील वाहन  

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here