जत महसूलला भ्रष्टाचाराची किड | बसपचे निवेदन ; मंडल अधिकारी,तलाठी लुटेरे

0
20



जत,संकेत टाइम्स : जत महसूल विभागाला भ्रष्टाचाराची किड लागली आहे.महसलूचे मंडल अधिकारी, तलाठ्याकडून तालुक्यातील शेतकरी, सामान्य नागरिकांची दिवसाढवळ्या लुट केली जात आहे.जत महसूल विभागामध्ये लुटेरे गँग बनली आहे.प्रांताधिकारी,तहसीलदार यांना महिन्याला ‌हप्ता द्यावा लागतो,त्यामुळे असे पैसे घ्यावे लागत असल्याचे मंडल अधिकारी, तलाठी सांगत आहेत.या सर्व प्रकाराची उच्च स्तरीय त्रयस्थ अधिकारी नेमून तपासणी करून जत महसूलचा कारभार सुधारावा,अशी मागणी बहुजन समाज पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे.







याबाबतचे निवेदन महसूल‌ मंत्री बाळासाहेब थोरात,पुणे विभागीय आयुक्त,जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी,प्रांताधिकारी प्रंशात आवटे,आमदार विक्रमसिंह सांवत यांना देण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे कि, जत तालुक्यातील सर्व तलाठी तसेच मंडळ अधिकारी यांच्या कार्यशैलीचा तालुक्यातील लोकांना त्रास होत असून तहसिल कार्यालयाशी संबंधित खरेदी विक्री,दस्ताच्या नोंदी करणे, त्या मंजूर करणे तसेच त्यांचेकडे चौकशीसाठी येणाऱ्या प्रकरणांची चौकशी करुन मुदतीत अहवाल देणे, वारसा नोंदी करणे, अपाक कमी करणे, तहसिलदार यांचेसमोर चालणाऱ्या सर्व केसेस 85 सेक्शन,रस्त्याचे प्रश्न,उतारे दुरुस्ती प्रकरणे व इतर अनेक कामामध्ये जाणीवपूर्वक लोकांना,पक्षकारांना वेठीस धरुन पैशाची अवास्तव मागणी करुन जनतेची थेट लुट तहसिलदार सचिन पाटील यांच्या सहकार्यातून सुरू आहे. आम्ही तलाठी व मंडळ अधिकारी यांच्याबाबत वेळोवेळी लेखी अथवा तोंडी तक्रारी तहसिलदार पाटील प्रांताधिकारी‌ आवटे यांचेकडे केल्या आहेत.परंतु त्यांनी याकडे दुर्लक्ष करत,अशा भ्रष्ट, बेजबाबदार तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचे काम केले आहे.






तहसीलदार हे तालुक्याचे प्रमुख असून लोकांची बहुतांश कामे ही तहसिल कार्यालयाशी संबंधित आहेत.अशा महत्वाच्या ठिकाणी लोकांना पैशासाठी वेठीस धरले जाते.ही बाब चिंताजनक व गंभीर असून सद्यस्थितीत जत तहसिल कार्यालय हे जनतेला लुटण्याचे भष्ट्राचाराचे केंद्र बनले आहे.तलाठी व मंडळ अधिकारी सरळ-सरळ तहसिलदार सचिन पाटील,प्रांताधिकारी प्रशांत आवटे यांना महिन्याला हप्ते द्यावे लागतात,असे सांगून पक्षकारांकडून व लोकांच्याकडून पैशाची उघड उघड मागणी करीत आहेत.एकाद्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नाव वापरून होणारी लुट अतिशय गंभीर असून याची झळ सर्वसामान्य जनतेला बसत आहे.या सर्व प्रकारांला तालुक्यातील वरिष्ठ अधिकारी खतपाणी घालत आहेत.अशा प्रकाराची खातेनिहान चौकशी करावी,लुटीचा प्रकार थांबवावा,अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.यावेळी महाराष्ट्र प्रदेश सचिव शंकर माने,जिल्हाध्यक्ष लहरीदास कांबळे,तालुका अध्यक्ष तानाजी व्हनखंडे,शरद शिवशरण,श्रीकांत सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.






चौकशी अहवाल दाबले 


अनेक मंडल अधिकारी, तलाठ्याच्या चौकशीचे अहवाल दाबले आहेत.जतचे मंडल अधिकारी, उमराणीचे तलाठी सह‌ अनेकांच्या विशेष समिती नेमून भ्रष्ट कारभाराची चौकशी करण्यात आल्या आहेत.समितीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी अहवालात गंभीर प्रकार समोर आणले आहेत.मात्र हे अहवाल प्रांत कार्यालयात लटकले असून यावर कारवाई होणार का? तेही दाबले जाणार याबाबातही आम्ही आवाज उठवणार आहोत,असे जत विधानसभा अध्यक्ष तानाजी व्हनखंडे यांनी सांगितले.


Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here