जत,संकेत टाइम्स : जत येथील राजारामबापू पाटील सह.कारखान्याने एमआरपी पेक्षा कमी दिल्याच्या पार्श्वभूमीवर शेतकरी आंदोलकांनी गुरूवारी जत दौऱ्यावर आलेल्या मंत्री महोदयांच्या वाहनाचा ताफा अडवून काळे झेडे दाखविले.याप्रकरणी भाजपा नेते लक्ष्मण जकगोंड यांच्यासह 11 जणाविरोधात जत पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
अधिक माहिती अशी, जत येथील कारखाना इस्लामपुर येथील कारखान्याने विकत घेतला आहे.सध्या त्यांच्याकडून कारखान्याचा गळीत हंगाम सुरू आहे. पहिल्या टप्यातील बिलेही जमा केली जात आहेत.मात्र जतच्या भूमीपुत्र ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एम आर पी पेक्षा कमी दर दिला जात आहे.एमआरपी नुसार दर द्यावा,अन्यथा मंञ्याच्या गाड्या अडवू असा इशारा जकगोंड यांनी दिला होता.अखेर गुरूवारी जत दौऱ्यावर आलेल्या मंत्री दादा भुसे,यशोमती ठाकुर,विश्वजीत कदम यांचा ताफा जकगोंड व अन्य आदोलकांनी अडविण्याचा प्रयत्न केला.
पोलीसांनी सतर्कता दाखविल्याने पुढील घटना टळली.दरम्यान काही आंदोलकांनी काळे झेडे दाखविले.पोलीसांनी आंदोलक जकगोंड सह गुरूबसू भावीकट्टी,प्रंशात भावीकट्टी, कुमार जावीर,दादासो टीगरे,कुमार बाबान्नवर,सुरेश मुडसी,महेश मुडसी,मादुराया पाटील,गोडाप्पा मदभावी,रावसाहेब पाटील या आंदोलकांनी पोलीसांनी अटक करत बेकायदेशीर जमाव जमवून,मंञ्याच्या वाहनास अडथळा केला म्हणून भादवि 341/143/149 बिपी अँक्ट 037/135 अन्वेय प्रतिबंधित कारवाई केली आहे.
दरम्यान आम्ही शेतकऱ्यांच्या ऊसाला योग्य भाव मिळावा म्हणून शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होतो.मंत्री महोदयांना थांबवित निवेदना देण्याचा आमचा मनोदय होता.यापुढे यापेक्षा तीव्र आंदोलन करू असा इशारा ही लक्ष्मण जकगोंड यांनी दिला आहे.