सांगली: सांगली जिल्ह्यात कर्नाळ रोडवरील ‘हॉटेल रणवीर’वर छापा टाकून सेक्स रॅकेट उद्ध्वस्त केले असून अटक केलेल्या आरोपींमध्ये आटपाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, हॉटेल मालक, एजंट यांचाही समावेश आहे. हॉटेलमधील छापेमारीत दोन तरुणीही सापडल्या. अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.
आटपाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरुण देवकर, हॉटेल मालक राघवेंद्र शेट्टी, रवींद्र शेट्टी, राजेश यादर, शिवाजी वाघले, सत्यजित पंडित अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर दोन महिलांची महिला सुधारगृहात रवानगी केली आहे. वेश्या अड्ड्यावर पोलिस निरीक्षकाला अटक झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पिटा (अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक) कायद्यानुसार हॉटेलवर कारवाई करण्यात आली. सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना याप्रकरणी अटक झाल्याने आटपाडी तालुक्यात खुमासदार चर्चा चालू आहे.