कोरोना योध्दा सुभाष कोळी यांचा सत्कार

0
7



जत,संकेत टाइम्स : जत शहरात कोरोना काळात प्रभावी काम करणाऱ्या कोरोना योद्याचा प्रजासत्ताकदिनी सत्कार करण्यात आला.जतचे कोतवाल असलेले सुभाष कोळी यांनी कोरोना काळात जेथे कोणही जाण्यास धजावत नव्हते.अशा ठिकाणी जात कंटेनमेट झोन करणे,औषधे,अन्नदान्ये,वैद्यकीय माहिती पोहच विण्याचे प्रभावी काम केले आहे.वास्तविक पाहता अनेकजन कोरोना योध्दा म्हणून समोर येत आहेत.








मात्र प्रत्यक्षात कोरोना योध्दा म्हणून ज्यांचा उल्लेख करणे,गौरव करणे गरजेचे होते,वेळाने का होईना कोळी यांच्या कार्याची प्रजासत्ताक दिनी दखल घेण्यात आली.कोतवाल सुभाष कोळी यांचा प्रजासत्ताक दिनी आमदार विक्रमसिंह सांवत यांच्याहस्ते कोरोना योध्दा म्हणून गौरव करण्यात आला.यावेळी माजी आमदार विलासराव जगताप प्रांताधिकारी तुषार ठोंबरे,तहसीलदार सचिन पाटील उपस्थित होते.








कोरोना योध्दा सुभाष कोळी यांचा गौरव करत आ.सावंत यांच्याहस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here