दिल्लीतील शेतकरी ट्रॅक्टर मोर्चाला हिंसक वळण !

0
2



दिल्लीमध्ये ट्रॅक्टर परेड शांततेने काढणार काढण्यात येणार असल्याचं शेतकरी संघटनांकडून सांगूनही,शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण लागले.

दिल्ली पोलिसांच्या अथक प्रयत्नांनंतरही शेतकरी आंदोलकांनी अतिशय आक्रमक स्वरुपात लाल किल्ल्यावर पोहचले.तिथं त्यांनी मोठमोठ्यानं घोषणा देत,लाल किल्ल्यावर प्रवेश करत हिंसक पातळी ओंलाडली.







दरम्यान हिंसक रूप घेतलेल्या शेतकऱ्यांनी पोलीसांचे बँरिकेट तोडून दिल्ली प्रवेश केला.पोलीस शेतकऱ्यांत हाताघाई झालेली दिसून आली.प्रजासत्ताक दिनाच्याच दिवशी देशात अशा प्रकारे अराजकता पसरवत आणि हिंसक मार्गाचा अवलंब करत शेतकऱ्यांची ही भूमिका आता या शांततापूर्ण आंदोलनाला गालबोट लावून गेली आहे.सुरुवातीला शांत वाटणारं वातावरण क्षणार्धातच बदलून गेलं.देशभरात दोन्ही बाजूने वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिवसभर उमटत आहेत.





राजधानी दिल्लीतील शेतकरी आंदोलनाने आयोजित केलेल्या ट्रॅक्टर मार्चला काही ठिकाणी हिंसक वळण लागलंय. आक्रमक आंदोलकांनी दिल्लीतील लाल किल्ल्यावर चढाई केली आहे. या ठिकाणी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापटही झालीय. काही ठिकाणी पोलिसांनी आंदोलकांवर अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्यात. त्यामुळे आंदोलक अधिकच आक्रमक होताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर दिल्लीतील सुरक्षा दलं सतर्क झालीत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वात या आंदोलनावर चर्चा सुरु आहे. आंदोलक अधिक भडकू नये म्हणून दिल्लीत इंटरनेट सेवाही बंद करण्यात आलीय.







दिल्लीत शेतकरी आंदोलनाने आक्रमक रुप धारण केल्यानंतर दिल्लीतील इंटरनेट सेवेसह मेट्रो सेवाही बंद करण्यात आलीय. इंडिया गेटकडे जाणारे सर्व मार्ग बद करण्यात आलेत. याशिवाय जामा मशीद देखील बंद करण्यात आली.


दिल्ली हे अतिविशेष व्यक्तीच्या निवासाचं शहर असल्याने या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यापैकीच एक असलेल्या राष्ट्रपती भवनाबाहेर कडेकोट सुरक्षा ठेवण्यात आली. याशिवाय पंतप्रधानांच्या घराबाहेरही चोख सुरक्षा व्यवस्था करण्यात आलीय.


Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here