– मंगळवार व बुधवार वर्धा येथे वृत्तपत्र विक्रेता राज्य अधिवेशन
वृत्तपत्र विक्रेता कोरोनासारख्या महामारीत सुद्धा आपली सेवा सुरू ठेवत सत्य व ताज्या बातम्या वाचकांना घरपोच करणारा महत्त्वाचा घटक. या आम्हा वृत्तपत्र विक्रेता बांधवांचे राज्य अधिवेशन वर्धा येथे 26 व 27 जानेवारी रोजी होत आहे. संपूर्ण जगाला साखर झोपेत असतानाच गुड न्यूज पोहोच करणारा हा घटक मात्र स्वतःच्या आयुष्याचे प्रगतीसाठी शासनाने कल्याणकारी मंडळ स्थापन करून लाभ मिळण्यास सुरवात झाली या गुड न्यूजसाठी मात्र वर्षानुवर्ष झगडत आहे.
ज्या बाळासाहेब ठाकरे यांनी सर्व प्रथम मुंबईपासून वृत्तपत्र विक्रेत्यांना आधार द्यायचे काम केले त्याच बाळासाहेबांचे चिरंजीव उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत.पण दुर्दैवाने मागील भाजप सरकारने वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांबाबत जे काम केले त्यामध्ये काडीचीही प्रगती या सरकारने केलेली नाही.
राज्यात लाखो कुटुंबं या वृत्तपत्र वितरण क्षेत्रात राबतात. सारं जग साखर झोपेत असताना थंडी, वारा, पाऊस असो की कोरोना सारखी महामारी वृत्तपत्र वितरण अखंडितपणे (अपवाद वगळता) सुरू राहीले आहे.आज या व्यवसायात अनेक अडचणी आहेत. वाचक घटत आहे, सहाजिकच व्यवसाय कमी होत आहे.वृत्तपत्र विक्रेते व वृत्तपत्र व्यवस्थापन यांनी एकत्रीत येऊन वाचक वाढीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
वृत्तपत्र विक्रेता बांधवांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करणे अत्यावश्यक आहे. मागील सरकारच्या काळात अभ्यास समिती नेमण्यात आली होती. त्या समितीने आपला अहवाल दिला आहे.त्या अहवालाचा स्वीकार करून स्वतंत्र कल्याणकारी मंडळ व इतर मागण्यांची पुर्तता करणे गरजेचे आहे. याबाबत शासनाने गतीने पावले उचलली नाहीत तर रस्त्यावर उतरून आक्रमकपणे आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. प्रसंगी सरकारशी असहकार पुकारण्याचे पाऊलही उचलावे लागले तरी ते उचलले पाहीजे.
हजारो कोटींची उलाढाल असणारे या व्यवसातुन सरकारलाही अनेक लाभ आहेत.त्यामुळेच या क्षेत्रातील कष्टकरी वृत्तपत्र विक्रेता घटकाचे आयुष्याची प्रगती साधण्यास निर्णय घेणे ही सरकारची जबाबदारी आहे. राजकारणासाठी जातीपातीच्या आधारावर शासकीय निर्णय घेणारे व धोरण ठरवणारी सर्वच सरकारे माणुसकीच्या नात्याने जगणारे या वृत्तपत्र विक्रेत्यांना न्याय देणार आहे की नाही? की आत्महत्या, उपासमार अशा घटना घडण्याची प्रतिक्षा हे सरकार करीत आहे?
सरकारने आता वृत्तपत्र विक्रेत्यांचा अंत न पाहता वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळाची घोषणा करून येत्या बजेटमध्ये आर्थिक तरतुद करावी.
वर्धा येथे होणारे राज्य अधिवेशनाच्या निमित्ताने वृत्तपत्र विक्रेत्यांच्या या मागणीबाबत सरकारने आपली भूमिका जाहीर करावी. कोरोना काळातील काम पाहता फ्रंटलाईन वर्कर यादीत वृत्तपत्र विक्रेत्यांचा सहभार करून आरोग्य सुविधा द्याव्यात अशी विनंती आहे.
विकास सूर्यवंशी सांगली
उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना
vikas1371@rediffmail.com
Mobile 9011036419