मुंबई | वेळ देऊनही राज्यपाल उपस्थित नसल्याने आंदोलकांनी निवेदन फाडले

0
3



मुंबई : शेतकऱ्यांच्या दिल्ली येथे सुरु असलेल्या आंदोलनाला पांठिबा देण्यासाठी हजारोच्या संख्येने महाराष्ट्रतील शेतकरी मुंबईच्या आझाद मैदानात दाखल झाले आहेत.

आझाद मैदान ते थेट मोर्चा राजभवनाकडे जात असताना मेट्रो सिनेमा चौकात पोलीसांनी अडवला गेला. राज्यपाल मुंबईत नसल्याची माहिती मोर्चेकऱ्यांना मिळाली. 



राज्यपाल स्वत: वेळ देऊनही उपस्थित नसल्याने संयुक्त मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक झाले.त्यांनी राज्यपालांचा निषेध करत संताप व्यक्त केला. संयुक्त मोर्चाच्या वतीने राजभवनावर जाण्याचा निर्णय थांबवत राज्यपालांना देण्यात येणारे निवेदन फाडून निषेध व्यक्त केला.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here