गुगवाड,(संकेत टाइम्स): गुगवाड ता.जत ग्रामपंचायतीवर पुन्हा कॉग्रेसने सत्ता मिळविली आहे.विरोधी भाजपच्या गटाचे तीन सदस्य विजयी झाले आहेत.
अत्यंत चुरशीने झालेल्या या निवडणूकीत कॉग्रेसचे नेते तथा माजी संरपच गंगप्पा कोंकणी यांच्या नेतृत्वाखाली पँनेलने बाजी मारत आठ सदस्य विजयी झाले आहेत. कॉग्रेसचा गड असलेला गुगवाड पुन्हा अभेध राहिला आहे.नव्या दमाच्या चेहऱ्यांना या निवडणूकीत उतरविण्याचा प्रयोग चांगलाच यशस्वी झाला आहे.
कॉग्रेसच्या पँनेलमधून अनेक नवे तरूण विजयी झाले आहेत.महादेव अंदानी, मीनाक्षी हिरेमठ,इंद्राबाई पाटील, शंकर कांबळे, बाळप्पा उगार, हुच्चप्पा कोंकणी, शारव्वा कांबळे, खुतुजा मुल्ला,असे आठ सदस्य कॉग्रेसच्या पँनेलमधून विजयी झाले आहेत.तर रावसाहेब चौगुले,सुंदरव्वा नरुटे, रत्नव्वा अंदानी असे तीन सदस्य भाजपा प्रणीत पँनेलमधून विजयी झाले आहेत.
पँनेल प्रमुष गंगप्पा कोंकणी म्हणाले,गेल्या अनेक वर्षापासून आम्ही केलेला स्वच्छ, पारदर्शी कारभारामुळे जनतेने आम्हाला पुन्हा सत्ता देऊन पोचपावती दिली आहे. गावाच्या सर्वागिंण विकासासाठी आमचे शिलेदार कायम कठीबध्द राहतील.
दरम्यान नव निवार्चित सदस्यांचा हभप तुकाराम महाराज यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
गुगवाड ता.जत ग्रामपंचायतीचे नव निर्वाचित सदस्यांचा सत्कार कराताना हभप तुकाराम महाराज