सांगली : सेवानिवृत्त पोलिस हवालदार यांनी पत्नी आणि मुलासहित केली आत्महत्या केल्याची घटना मिरज तालुक्यातील बेळंकी गावात घडली आहे.
सेवानिवृत्त पोलीस अन्नासो गुरसिद गव्हाणे (वय 65),पत्नी मालन अन्नासो गव्हाणे (वय 50) आणि मुलगा महेश अन्नासो गव्हाणे एकाच घरातील तिघांनी गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याचे समोर आले आहे.
घटनास्थळी पोलीस पोहचले असून तपास सुरू करण्यात आला आहे.
सावकारी कर्ज व शेअर मार्केटमध्ये झालेल्या कोट्यावधी रुपयाच्या नुकसानीमुळे या तिघांनी आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे.