मुंबई : पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी चौकशी करणाऱ्या ईडीच्या पथकाने बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष तथा वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांच्याशी निगडीत विवा ग्रुपमध्ये तब्बल नऊ तास चौकशी केली होती.आ.हितेंद्र ठाकूर यांचे चुलत भाऊ दीपक ठाकूर यांचे मोठे चिरजिंव मॉंटी उर्फ मेहुल ठाकूर आणि त्यांच्या कंपनीचे कन्सल्टंट मदन गोपाल चतुर्वेदी यांनाही इडीने ताब्यात घेतले होते.
त्यांच्याकडे मुंबई येथील कार्यालयात चौकशी करण्यात आली होती . चौकशी दरम्यान रात्री उशिरा मेहुल आणि चतुर्वेदी यांना ईडीने अटक केली. त्यांना शनिवारी न्यायालयात उभे करण्यात येणार आहे. त्यानंतर ईडी तपासणी करण्यात येणार आहे.