केरळ : कधीही नशिब उजळेल शकते फक्त संयम महत्वाचा असतो.याचे उदाहरण एका लॉटरी विक्रेत्याच्या बाबतीत घडले आहे. आपल्याच दुकानातील लॉटरीला ग्राहक मिळत नसल्याने त्याने स्वत:च एक तिकीट घेतलं आणि नसीब उजळले,एका रात्रीत तो कोट्यधीश बनला. केरळ मधील एका लॉटरी तिकीट विक्रेत्याचं नशिब एका तिकीटामुळे काही क्षणात बदलले आहे. मंदीमुळे दुकानात ठेवलेली तिकीटं विकली जात नव्हती. विक्रेत्यानं स्वत:च एक तिकीट घेतलं आणि निकाल बघितला.
त्याला चक्क 12 कोटी रुपयांची त्याला लॉटरी लागली. टीओआयच्या माहितीनुसार, केरळ सरकारच्या ‘क्रिसमस न्यू इयर बंपर लॉटरी’चा निकाल लागला आणि शराफुद्दीन नावाचा तिकीट विक्रेता 12 कोटीचा मालक बनला. शराफुद्दीनकडे उरलेल्या तिकीटांमधील एका तिकीटाचा नंबर मिळाला आणि त्याला 12 कोटीची लॉटरी लागली. शराफुद्दीन म्हणाले की,
नशीबाने मला साथ दिली,आलेल्या पैशात प्रथम माझे कर्ज चुकते करणार आहे.त्यासोबत आणखीन एक छोटा व्यवसाय सुरू करणार आहे.एक चांगले घर बांधून मुलाला चांगले शिक्षण देण्यासाठी या पैशाचा उपयोग करणार आहे.