जत,प्रतिनिधी : साळमळगेवाडी ता.जत येथील दुध विक्रेत्यांची गळा चिरून खून करून पुरावा नष्ट करण्याच्या प्रकार घडला आहे.अजित बाबासो खांडेकर (वय 20)असे खून झालेल्या युवकांचे नाव आहे.ही घटना जत-वज्रवाड रस्त्यावरील जिरग्याळ फाटा या रस्ता येथे गुरूवारी मध्यरात्री घडली आहे.
याबाबत घटनास्थळ व पोलीसाकडून मिळालेली माहिती अशी,अजित खांडेकर हा वाड्यावस्त्यावर जाऊन दुध संकलन करतो.गुरूवारी संध्याकाळी संकलन केलेले दुध जिरग्याळ येथील डेअरीत आपल्या सहकार्यांला घालण्यास सांगितले.त्यानंतर अजित खांडेकर हा पुढील वस्तीवर दुध संकलनासाठी गेला होता.रात्री आठ वाजण्याच्या सुमारास तो दुध घेऊन येत होता.त्यादरम्यान त्याचा अज्ञातांनी गळा चिरून खून केला आहे.
त्यांच्या शरिरावर धारदार हत्याराने छातीवर वार केल्याचे जखमा आहेत.त्यानंतर गवताला आग लावून देण्या़त आली, असून चेहरा अर्धवट व कपडे अर्धवट जाळून पुरावा नष्ट प्रयत्न केला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी संशयिताचा तपास सुरू केला आहे. अप्पर पोलीस अधिक्षक मनीषा डुबुले,डिवायएसपी रत्नाकर नवले यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सुचना केल्या आहेत.याप्रकरणी राजू बाबासो खांडेकर यांनी फिर्याद दिली आहे.







