जत,प्रतिनिधी : जत पश्चिम भागातील स्वस्त धान्य दुकानातून पुन्हा नागरिकांची लुट करण्यात येत आहे.प्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजनेतील गरीब शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांची पुन्हा अडवणूक केली जात आहे.त्यात या दुकानदाराकडून हेळसाड करण्याचे प्रकार अनेक गावात होत आहेत.
डफळापूर परिसरातील स्वस्त धान्यदुकानातील अन्नसुरक्षा
यादीची फेरतपासणीची गरज करून खऱ्या लाभार्थांना लाभ मिळवून द्यावा,अशी मागणी होत आहे.
तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानातून गहू,मोफत तांदुळाचे सुरळीत वाटप करण्यात येत आहे,कोरोना काळात हे धान्य नागरिकांचा आधार बनले आहे.कोरोना लॉकडाऊनच्या पहिल्या तीन महिन्यात सतर्क झालेल्या महसूलच्या अधिकाऱ्यामुळे या धान्याचे वितरण सुरळीत झाले खरे मात्र ते औटघटकेचे ठरले आहे.पुन्हा या दुकानदारांनी कार्डधारकांना नाडविण्याचे प्रकार सुरू केले आहेत.
तालुक्यातील अपवाद वगळता अनेक दुकानदार वेळेत दुकाने उघडत नाहीत.धान्य कमी आले असल्याचे सांगत गरीबाच्या धान्यावर डल्ला मारण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत.त्याशिवाय धान्याचे दर वाढवून लुट केले जात असल्याचे आरोप होत आहेत.
जत पश्चिम भागातील दुकानात भानगडी
जत पश्चिम भागातील अनेक गावातील दुकानात अनेक रेशनकार्ड धारकांचे धान्य आले नसल्याचे सांगून त्यांना धान्य दिले जात नाही.त्याशिवाय मोफत गहूं,तांदुळ हडपणे,जादा पैसे लुटण्याचे प्रकार सुरू आहेत.असे हडपलेले धान्य काळ्या बाजाराने विकले जात असल्याचे आरोप होत आहेत.वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालावे अशी मागणी होत आहे.
दहा हजारामध्ये अन्नसुरक्षा यादी
जत पश्चिम भागातील अनेक स्वस्तधान्य दुकानात यापुर्वी गरिंबाना डावलून श्रींमतांना अन्नसुरक्षा योजनेचा लाभ मिळवून दिला आहे.ज्या खरी गरज होती, अशांना डावलण्यात आले आहे.आता यांच स्वस्त धान्य दुकानदारांकडून अन्नसुरक्षा यादी समाविष्ट करण्यासाठी पाच ते दहा हजारापर्यत मागणी केली जात असल्याची चर्चा आहे.या प्रकारांची वरिष्ठ स्तरीय अधिकाऱ्यांनी चौकशी करावी,अशी मागणी होत आहे.
स्वस्तधान्य दुकानदारांना खुमखुमी
जत पश्चिम भागातील अनेक स्वस्तधान्य दुकानदार गरिबांचे धान्य लुटून गबरगड्ड झाले आहेत.त्यांच्याविरोधात तक्रार करणाऱ्यांना धमकाविणे,अगदी अंगावर जाण्यापर्यत या स्वस्तधान्य दुकानदारांना खुमखुमी आली आहे.
जत पश्चिम भागातील स्वस्तधान्य दुकानाची तपासणी बारगळी
तालुक्यात काळ्या बाजारात तस्करीसाठी जाणारे स्वस्तधान्य दुकानातील धान्य सापडल्यानंतर
जत पश्चिम भागातील स्वस्तधान्य दुकानांची तपासणी करण्यात येईल असे तहसीलदार सचिन पाटील यांनी सांगितले होते.मात्र ही तपासणी बारगळ्याची चर्चा आहे.